काँग्रेसने लावलेल्या अच्छे दिनच्या फलकाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:28 AM2021-05-26T04:28:47+5:302021-05-26T04:28:47+5:30
वरोरा : मोदी सरकार दोनच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने वरोरा शहर काँग्रेसतर्फे पाच वर्षात पन्नास टक्के भाववाढ या मथळ्याखाली लावलेले ...
वरोरा : मोदी सरकार दोनच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्ताने वरोरा शहर काँग्रेसतर्फे पाच वर्षात पन्नास टक्के भाववाढ या मथळ्याखाली लावलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय ठरले आहे.
या फलकात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दराची २०१५ व २०१९ वर्षाची तुलना करण्यात आली आहे. पाच वर्षात ५० टक्के भाववाढ झाली, असे सांगून मोदी सरकारचे अच्छे दिन! असा उपहासात्मक प्रश्न करण्यात आला आहे. याबाबत वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास टिपले म्हणाले, पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. डिझेल व गॅस सिलिंडरचे दरही दिवसागणिक वाढत आहेत. यामुळे वाढत्या महागाईत तेल ओतले जाऊन सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पार बिघडून गेले आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य जनता आधीच आर्थिक संकटात सापडली असताना त्यात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करावेत, अशी मागणी विलास टिपले यांनी केली आहे.
===Photopath===
250521\img-20210525-wa0050.jpg
===Caption===
image