आयुध निर्माणी कामगारांच्या प्रश्नांवर संरक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:09 PM2018-07-10T23:09:36+5:302018-07-10T23:10:12+5:30

आयुधनिर्माणी चांदा (भांदक) येथे कार्यरत कामगारांच्या विविध मागण्यांबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत आयुधनिर्माणी कामगारांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन ना. भामरे यांनी दिले.

Discussions with the State Ministers on the issue of Ordnance Factory workers | आयुध निर्माणी कामगारांच्या प्रश्नांवर संरक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा

आयुध निर्माणी कामगारांच्या प्रश्नांवर संरक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा

Next
ठळक मुद्देदिल्लीत भेट : हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने पार पडली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आयुधनिर्माणी चांदा (भांदक) येथे कार्यरत कामगारांच्या विविध मागण्यांबाबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत आयुधनिर्माणी कामगारांच्या मागण्या सोडविण्याचे आश्वासन ना. भामरे यांनी दिले.
या बैठकीस आयुधनिर्माणीच्या विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. अहीर यांनी आयुधनिर्माणीतील कामगारांशी निगडीत विविध समस्या व अडचणी संदर्भात ना. भामरे यांना माहिती देत चर्चा केली. तर कामगार नेत्यांनी कामगारांना पुरेसे काम उपलब्ध होत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती दिली.
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आयुधनिमार्णीतील कामगारांचे वर्कलोड वाढविण्यात येईल, असे आश्वासन ना. अहीर व कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाला देत बैठकीला उपस्थित संरक्षण मंत्रालयाच्या सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.
बैठकीला संरक्षण खात्याचे सचिव, संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयुधनिर्माणी चांदाचे महाप्रबंधक गुप्ता, सुनील नामोजवार, प्रशांत डाखरे, मजदुर युनियनचे गुलाब चैधरी, भारतीय मजदूर संघाचे सदानंद गुप्ता, इंटकचे राजेश यादव, शितल वालदे, रेड युनियनचे सदानंद वाघ, विवेक खांडोकर, विजय कांबळे, रूपेश सोमलकर आदी उपस्थित होते.
चंद्रपुरात केंद्र सरकार स्वास्थ्य योजनेचे उपकेंद्र
बैठकीमध्ये आयुधनिर्माणी चांदा येथील सेवानिवृत्त कर्मचारी, कामगारांना शासनाच्या सीजीएचएस योजनेचा पुरेसा व वेळेवर लाभ होत नसल्याच्या प्रश्नाकडे संरक्षण राज्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. सीजीएचएसचे केंद्र नागपुरात असल्याने सेवानिवृत्तांना आरोग्य सोयीच्या लाभापासून वंचित रहावे लागते. नागपूरला जाऊन उपचार घेणे, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सेवानिवृत्तांना शक्य होत नाही. त्यामुळे स्वास्थ योजनेचे उपकेंद्र चंद्रपुरात सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव ना. अहीर यांनी डॉ. भामरे यांच्यासमोर मांडला. यावर चंद्रपुरकरिता सीजीएचएस उपकेंद्र सुरू करण्यासाठी अधिकाºयांनी त्वरित माहिती घेण्याचे निर्देश ना. भामरे यांनी दिले.

Web Title: Discussions with the State Ministers on the issue of Ordnance Factory workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.