पालिका कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:24 IST2018-01-09T23:23:44+5:302018-01-09T23:24:32+5:30

शहरातील मुख्य रस्त्याजवळ वरोरा नगरपालिकेने वॉल्व्हसाठी खड्डे खोदले. ‘त्या’ खड्ड्यात पडून एक इसम दोन दिवसांपूर्वी गंभीर जखमी झाला.

Disruption in municipality office | पालिका कार्यालयात तोडफोड

पालिका कार्यालयात तोडफोड

ठळक मुद्देनागरिक संतप्त : पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून इसमाचा मृत्यू

आॅनलाईन लोकमत
वरोरा : शहरातील मुख्य रस्त्याजवळ वरोरा नगरपालिकेने वॉल्व्हसाठी खड्डे खोदले. ‘त्या’ खड्ड्यात पडून एक इसम दोन दिवसांपूर्वी गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान ‘त्या’ इसमाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली व कार्यालयाला कुलूप ठोकले.
वरोरा शहरातील माढेळी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ वॉल्व्ह बसविण्याकरिता नगर परिषदेच्या वतीने खड्डा खोदला. कैलास थोरात हा व्यक्ती २९ डिसेंबर रोजी या खड्डयात पडून जखमी झाला. त्याला गंभीर दुखापत झाली असल्याने सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी उपचारादरम्यान कैलास थोरात याचा मृत्यू झाला. कैलास थोरात मृत पावल्याची वार्ता वरोरा शहरात येताच नागरिक संतप्त झाले. त्यांनी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न.प. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांवर कारवाई करावी व मृताच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीकरिता संतप्त नागरिकांनी न.प. कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त नागरिकांना अधिकाºयांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करीत कार्यालयाला कुलूप ठोकले.
अन्यथा मृतदेह पालिकेत ठेऊ
सदर खड्डा मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी खोदण्यात आला. यामध्ये अपघात होण्याची शक्यता होती. याबाबत न.प. प्रशासनाला निवेदनही दिले. परंतु न.प. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर इसमाचा मृत्यू झाला. त्यामुळे न.प. ने मृतकाच्या वारसदारांना आर्थिक मदत द्यावी. अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडू. तसेच मृतदेह न.प. कार्यालयात घेऊन येऊ, असा इशारा नगरसेवक छोटू शेख यांनी दिला.

सदर प्रकरणात तत्काळ चौकशी समिती नेमू. यामध्ये दोषी असणाऱ्यांविरूद्ध कार्यवाही करण्यात येईल.
- सुनील बल्लाळ,
मुख्याधिकारी, न.प. वरोरा.

Web Title: Disruption in municipality office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.