विघ्नहर्त्याच्या आगमनाला ‘खड्ड्यांचे विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:45 PM2018-08-28T22:45:09+5:302018-08-28T22:45:43+5:30

बाप्पाची चाहुल लागताच मूर्तीकार मूर्ती घडविण्यात व्यस्त झाले असून गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मात्र चंद्रपुरातील प्रमुख रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे यंदा विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न आणणार काही काय, अशी चिंता गणेशभक्तांना सतावत आहे.

'Disruption of potholes' | विघ्नहर्त्याच्या आगमनाला ‘खड्ड्यांचे विघ्न’

विघ्नहर्त्याच्या आगमनाला ‘खड्ड्यांचे विघ्न’

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था : गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण

परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बाप्पाची चाहुल लागताच मूर्तीकार मूर्ती घडविण्यात व्यस्त झाले असून गणेशभक्त मोठ्या उत्साहात बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहेत. मात्र चंद्रपुरातील प्रमुख रस्त्यासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे यंदा विघ्नहर्त्याच्या आगमनात विघ्न आणणार काही काय, अशी चिंता गणेशभक्तांना सतावत आहे.
जिल्ह्यात १५०० सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे तर ११ हजार ८५० घरगुती गणेशमूर्तीची स्थापना मागीलवर्षी करण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर शहरामध्ये २९६ गणेशमंडळांद्वारे तर तीन हजार १५ घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली होती. जिल्ह्यात गणपतीची वाजत-गाजत स्थापना व विसर्जन करण्याची जिल्ह्याची परंपरा आहे. जिल्ह्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने गणेशमूर्ती स्थापना करण्यासाठी नेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पावसापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असतानासुद्धा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गणेशभक्तांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. चंद्रपुरातील कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, तुकूम मार्ग, चंद्रपूर-नागपूर मार्ग, रामनगर, बाबुपेठ मार्ग, गांधी चौक ते बागला चौक मार्ग, गांधी चौक ते पठाणपुरा मार्ग, रहमत नगर मार्ग या प्रमुख मार्गासह दवाबाजार ते पाण्याची टाकी, अंचलेश्वर गेट ते लालपेठ, सवारी बंगला ते चोर खिडकी, वाहतूक कार्यालय याठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुनच गणेशभक्तांना गणपतीची मूर्ती न्यावी लागते. मागील काही वर्षांपासून शासनाने प्लॉस्टर आॅफ पॅरिसच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्यास बंदी घातली आहे. भक्तांना मातीच्या गणपतीची स्थापना करावी लागते. मूर्तीकार तणस व मातीच्या साह्याने मूर्तीला आकार देत आहेत. गणेशाची मूर्ती स्थापनेसाठी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांना सामोरे जाण्याची पाळी आहे. गणेशभक्तांची ही समस्या लक्षात घेऊन बांधकाम विभाग व मनपाने दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे.
अरुंद रस्त्यामुळे त्रास
शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. त्यातही व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने हे रस्ते पुन्हा अरुंद झाले आहेत. त्यातही वाहनचालक रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहन ठेवतात. यातून वाहतूकीची कोंडी होत असते. यातच शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. यामुळे भक्तांना गणपती मूर्तीची स्थापना करण्यासाठी घरी नेताना अडचणींचा सामना करावा लागतो.
१५ दिवसांतच उखडले रस्ते
चंद्रपुरात मागील महिन्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्यांची डागडूजी सुरु केली. मात्र डागडूजी करताना केवळ माती मिश्रित साहित्यांचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्याभरात पाच दिवस संततधार पाऊस पडल्याने डागडूजी केलेले रस्ते पूर्णपणे उखडले आहेत.
जटपुरा गेट ठरतो अडसर
शहरातील ऐतिहासिक जटपूरा गेटमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेतर्फे याबाबत आंदोलनही केले. मात्र अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सदर गेट हा अरुंद तसाच कमी उंचीचा असल्याने याठिकाणातून गणपतीची मूर्ती जाण्यास अडचण निर्माण होते. अनेकदा गणपती नेताना गणेशभक्तांना तारेवरची कसरत करावी लागते.

Web Title: 'Disruption of potholes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.