जि. प. पदाधिकाऱ्यांच्या वादामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराच्या प्रतिष्ठेला गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:58 AM2021-09-02T04:58:56+5:302021-09-02T04:58:56+5:30
अडकल्याने आदर्श शिक्षक सन्मानाला गालबाेट लागल्याची प्रतिक्रिया शैक्षणिक वतुर्ळात उमटत आहे. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निवड प्रक्रियेवरून दरवर्षी वाद ...
अडकल्याने आदर्श शिक्षक सन्मानाला गालबाेट लागल्याची प्रतिक्रिया शैक्षणिक वतुर्ळात उमटत आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निवड प्रक्रियेवरून दरवर्षी वाद उफाळतो. गतवर्षीदेखील जि. प. उपाध्यक्षांना विश्वासात न घेता शिक्षक पुरस्कारांची घोषणा केल्याचा आरोप झाला होता. यावर्षी जिल्हाभरातून ३६ प्रस्ताव आले. माध्यमिक व कला विभागातून प्रत्येकी एक प्रस्ताव आला आहे. या दोन विभागात कोणतीही स्पर्धा नाही; पण प्राथमिक विभागातून १५ पुरस्कारांसाठी स्पर्धा सुरू झाली. शिक्षण विभागाकडून गुणांकनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २८ ऑगस्टला जि.प. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. काही शिक्षकांच्या नावावर या बैठकीत एकमत झाले तर काहींच्या नावावरून पदाधिकाऱ्यांमध्येच नाराजीचा सूर आवळला.
बॉक्स
स्वाक्षरी झाली तरच यादी विभागीय आयुक्तांकडे
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आदर्श शिक्षक निवड यादीवर स्वाक्षरी केली नाही.
जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा यादीवर स्वाक्षरी केल्याचे समजते. उर्वरित तीन पदाधिकाऱ्यांनी यादीला संमती दिली नाही. शिक्षण समितीतीला सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीनंतर ही यादी विभागीय आयुक्त कार्यालयात पाठविली जाते. मंजुरीनंतर आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या नावांची घोषणा होते.