जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वितरित करा

By admin | Published: July 16, 2014 12:06 AM2014-07-16T00:06:42+5:302014-07-16T00:06:42+5:30

कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी पेरणी वाया गेली. दुबार पेरणीची नामुष्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा

Distribute free seeds to the farmers of the district | जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वितरित करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वितरित करा

Next

चंद्रपूर : कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी पेरणी वाया गेली. दुबार पेरणीची नामुष्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांना मोफत त्वरित बीयाणे पुरविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली. मागील वर्षीच्या नैसर्गिक कोपामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला दुबार पेरणी करण्याकरिता बी-बियाणे, खते घेणे व दुबार पेरणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना ेबियाणे व खते मोफत पुरविण्यात यावे व वाहकावरील अर्थसहाय्य करण्यात यावे, याकरिता शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली.
मागील वर्षी राज्यात काही भागात गारपीट झाले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु तलाठ्यांनी या भागात गारपीट झालीच नाही, असा अहवाल तहसिलदारांना सादर केला. त्यामुळे शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. असा अन्याय जिल्ह्यातील शेतकरी कुटूंबियांवर होवू नये अशी विनंती करण्यात आली. कोणत्याही तालुक्यातील शेतकरी दुबार पेरणीपासून वंचित राहिल्यास जिल्हा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात, रमेश तिवारी, उपमहापौर संदीप आवारी, जयदीप रोडे, अविनाश पुट्टेवार, कुसूमताई उदार, मनोज पाल, रुपेश वाघाडे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Distribute free seeds to the farmers of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.