वाण म्हणून महापुरुषांच्या पुस्तकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:26 AM2021-01-21T04:26:13+5:302021-01-21T04:26:13+5:30
वरोरा : मकरसंक्रांतीनिमित्त वाण म्हणून विविध भांडी व साहित्य वाटण्याची परंपरा आहे. परंतु, या परंपरेला फाटा देत वरोरा येथील ...
वरोरा : मकरसंक्रांतीनिमित्त वाण म्हणून विविध भांडी व साहित्य वाटण्याची परंपरा आहे. परंतु, या परंपरेला फाटा देत वरोरा येथील मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित सालेकर कुटुंबीय दरवर्षी महापुरुषांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वाणात महापुरुषांच्या पुस्तके भेट देऊन नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
तिळसंक्रांत हा महिलांसाठी आनंदाचा सण. या सणानिमित्त महिला नवनवीन कपडे, अलंकार परिधान करून एकमेकींच्या घरी वाणासाठी जातात. वाणाकरिता पाचशे ते पाच हजारापर्यंतच्या वस्तू खरेदी करून वितरित करतात. निरुपयोगी छोट्या-मोठ्या स्टील, प्लॅस्टिकच्या वस्तूंचा काहीच फायदा होत नाही. मात्र वाण म्हणून महापुरुषांची पुस्तके दिली तर त्यांच्या विचारांच्या आचरणातून समाजजागृती होऊ शकते. या उद्देशाने मालेकर कुटुंबीयांतर्फे महापुरुषांच्या जीवनचरित्राची पुस्तके भेट म्हणून वाणात वाटली. या उपक्रमाने महापुरुषांचे चरित्र घराघरात पोहचले आहे.