बाधित शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:09+5:302021-08-14T04:33:09+5:30
चंद्रपूर : वरोरा, भद्रावती येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य वीजवाहिनी २२० केव्ही लाइन टॉवर गेले. यामुळे उत्पादनावर परिणाम ...
चंद्रपूर : वरोरा, भद्रावती येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातून महाराष्ट्र राज्य वीजवाहिनी २२० केव्ही लाइन टॉवर गेले. यामुळे उत्पादनावर परिणाम पडत असून टाॅवर असलेल्या भागात शेती करणे शक्य नाही. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.
या वेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे, भोयर यांची उपस्थिती होती.
या वेळी भाऊराव खिरटकर, कमलाकर दारुंदे, अनंत देशपांडे, शरद जंगलीवार, धनराज किन्नाके, राजू पिजदुरकर, नत्थू ददमळ, रामा निकुरे, अजबराव गावूतरे, सूर्यभान सिडाम, शिरंकर, कविता डोमकावडे, वासुदेव पिंपळकर, लक्ष्मण नन्नवरे, कवडू दुर्वे, नत्थू दडमळ, रमा बोधे, रोहित चामटे, सुरेश चिंचोलकर, उत्तम बल्की या शेतकऱ्यांना आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या समस्या आपण जवळून अनुभवल्या आहेत. कोणत्याच शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे त्रास होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे मत या वेळी धानोरकर यांनी व्यक्त केले.