आपादग्रस्तांना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:14 AM2017-10-22T00:14:39+5:302017-10-22T00:14:51+5:30
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी घोडपेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आपादग्रस्तांना चार लाख २५ हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोडपेठ : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यातर्फे बुधवारी सायंकाळी घोडपेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आपादग्रस्तांना चार लाख २५ हजारांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
घोडपेठ येथील प्रविण वासुदेव झाडे (२२) या युवकाचा शेतात फवारणी करून परत येत असतांना विज पडून मृत्यू झाला होता. प्रविणचे वडिल वासुदेव झाडे आणि मदनाताई यांना नामदार हंसराज अहीर यांच्या हस्ते शासकिय मदत म्हणून चार लाखांचा धनादेश देण्यात आला.
तसेच चालबर्डी (रै.) येथील गुलाब किसन जांभुळकर यांचा बैल वीज पडून मृत्यू पावला होता. त्यामुळे ऐन हंगामात या शेतकºयावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. याप्रसंगी गुलाब जांभूळकर यांनासुध्दा शासकिय मदत म्हणून २५ हजारांचा धनादेश देण्यात आला.
याप्रसंगी जि.प. सदस्य यशवंत वाघ यांनी आपल्या मनोगतातून शेतीपुरक व्यवसाय करावा, व शेतीसोबतच जोडधंदा करून आर्थिक सुबत्ता प्राप्त करावी, असे आवाहन केले.यावेळी जि.प. सदस्य यशवंत वाघ, राजू गायकवाड, विश्वास निमकर, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, नायब तहसीलदार मधूकर काळे, विवेक सुरावार, उपसरपंच विनोद घुगूल, ग्रा.पं. सदस्य गिरीश माहुलकर, अनिता देवगडे, परेश मैदमवार, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे, संदीप बोकारे, केशव लांजेकर, सुनिल नामोजवार, नागो निमकर, शामराव नांदे, सुधाकर येसेकर, रमेश जोगी, अनिल खडके, विजय सातपूते, गणपत साव आदी उपस्थित होते.