‘अल्ट्राटेक’तर्फे दत्तक गावांना कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:24+5:302021-05-28T04:21:24+5:30

अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड विजय एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील दत्तक गावांतील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, ...

Distribution of Corona Prevention Materials to Adopted Villages by Ultratech | ‘अल्ट्राटेक’तर्फे दत्तक गावांना कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप

‘अल्ट्राटेक’तर्फे दत्तक गावांना कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप

Next

अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड विजय एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील दत्तक गावांतील दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने नेहमीप्रमाणे यावेळेसही पुढाकार घेत कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप केले. आवारपूर, नांदा, नोकरी, पालगाव, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयेगाव, हिरापूर व सांगोळा अशा बारा गावात मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, गन थर्मामीटर, डेटॉल साबण, सोडियम क्लोराइड व कापूर ओवा पोतली या साहित्याचे वाटप करण्यात आलेे.

नजीकच्या हिरापूर गावातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होती. गावकऱ्यांच्या मागणीला दाद देत सीएसआर निधीअंतर्गत सर्व मागण्या पूर्ण करण्यात आल्या. येथील स्वयंसेवकांसाठी कोरोना सुरक्षा कीट वाटप करून जिल्हा परिषद शाळेत कंपनीद्वारे सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी टँकरद्वारे करण्यात आली. तसेच सर्व कोविड प्रतिबंधक साहित्य सुद्धा गावात देण्यात आले.

सतीश मिश्रा, सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी गावा-गावात साहित्य पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of Corona Prevention Materials to Adopted Villages by Ultratech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.