सेवा सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:28 AM2021-05-12T04:28:42+5:302021-05-12T04:28:42+5:30
बल्लारपूर : तालुक्यातील सेवा सहकारी संस्था यांच्यातर्फे कळमना, दहेली व बामणी येथील सभासदांना बल्लारपूर तालुक्याचे जिल्हा बँकेचे संचालक डॉ. ...
बल्लारपूर : तालुक्यातील सेवा सहकारी संस्था यांच्यातर्फे कळमना, दहेली व बामणी येथील सभासदांना बल्लारपूर तालुक्याचे जिल्हा बँकेचे संचालक डॉ. अनिल वाढई यांच्या हस्ते २०२१ - २२ करिता किसान क्रेडिट कर्ज व एटीएम कर्ज वितरण करण्यात आले.
यात कळमना संस्थेतील १६७ सभासदांना २ कोटी ८४ लाख, बामणी संस्थेतील १९२ सभासदांना ३ कोटी १४ लाख व दहेली येथील १४५ सभासदांना २ कोटी १२ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. हा छोटेखानी कर्ज वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले. याप्रसंगी बामणी संस्थेच्या अध्यक्ष नलिनी साळवे, उपाध्यक्ष सुजाता साळवे, दहेली संस्थेचे अध्यक्ष नागोबाजी राजूरकर, संचालक आनंदराव गायकवाड, आबाजी देरकर, कळमना संस्थेचे अध्यक्ष विनोद उरकुडे, सचिव एम. व्हि. सायसे, दिनेश शेरकी, सुधीर वानखेडे, अशोक पवार उपस्थित होते.