भाजी विक्रेत्यांना फेस मास्कचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:58+5:302021-09-08T04:33:58+5:30
चंद्रपूर : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद स्थापना दिनाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती रामनगर येथे अखिल भारतीय अधिवक्ता ...
चंद्रपूर : अखिल भारतीय अधिवक्ता परिषद स्थापना दिनाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती रामनगर येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे सर्व भाजी व फळ विक्रेत्यांना फेस मास्कचे वितरण करण्यात आले.
०७ सप्टेंबर ११९२ ला अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेची स्थापना करण्यात आली होती. दर ०७ सप्टेंबरला संपूर्ण भारतातील अखिल भारतीय अधिवक्ता परिषद सर्व शाखा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात. मागील काही वर्षांपासून कोरोना महामारीचे थैमान आहे. प्रशासनाच्या निर्देशाद्वारे कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी फेस मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे जिल्हा सचिव ॲड. संदीप नागपुरे यांच्या पुढाकाराने भाजी व फळविक्रेत्यांना फेस मास्कचे वितरण करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. अभय कुल्लरवार, सचिव ॲड. संदीप नागपुरे, ॲड. अभय पाचपोर, ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. गोपाल पाटील, ॲड. अमन मारेकर, ॲड. गिरीश मार्लीवार, ॲड. विनय लिंगे, ॲड. नितीन गाटकिने, ॲड. श्रीकांत धागमवार, ॲड. राशिद शेख, ॲड. सोमेश पंढरे, ॲड. राजेश जुनारकर, ॲड. उमेश देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य चवरे, ॲड. आशिष मुंधडा आदी उपस्थित होते.