३८,७१० हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:00 AM2021-10-08T05:00:00+5:302021-10-08T05:00:30+5:30

आ. मुनगंटीवार यांनी  महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र आहेत. ३१. ९० लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. त्यापैकी ३१.५१ लाख कर्ज खात्यांना २० हजार १०९ कोटी   वितरण करण्यात आले.  ६३ हजार ५१७ खात्यांना लाभ द्यावयाचा आहे.

Distribution of funds to 38,710 thousand farmers before Diwali | ३८,७१० हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी वितरण

३८,७१० हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी निधी वितरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना २्०१२ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील १ हजार ९२१ तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ३६ हजार ७८९ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही सहकार विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमार यांनी मुंबई येथील बैठकीत दिली. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत लक्ष वेधले होते.
यावेळी बैठकीला वित्त विभागाचे सचिव ओमप्रकाश गुप्ता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, अन्य अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी बंडू गौरकर, बबन पिंपळकर उपस्थित होते. आ. मुनगंटीवार यांनी  महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्ज वाटप योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान-२०१७ च्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत आ. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. महात्मा फुले कर्ज वाटप योजनेंतर्गत ३२. ५१ लाख खाते पात्र आहेत. ३१. ९० लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. त्यापैकी ३१.५१ लाख कर्ज खात्यांना २० हजार १०९ कोटी   वितरण करण्यात आले.  ६३ हजार ५१७ खात्यांना लाभ द्यावयाचा आहे. त्यासाठी ८५८ कोटींची गरज आहे. शेतकरी सन्मान योजनेत ३६ हजार ७८९ शेतकरी वंचित आहेत. त्यासाठी १७१. ०४ कोटींचा निधी लागणार आहे. यंदाची अर्थसंकल्पीय तरतूद १७५ कोटींची आहे. उर्वरित ६८३ कोटी उपलब्ध झाल्यास हा विषय निकाली निघेल.  त्यासाठी खातेदारांची तपासणी मोहीम पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

मुनगंटीवार भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत
विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्त करण्यात आली. मुनगंटीवार यांनी यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम कामगिरी केली होती. कार्यकर्ते व जनतेशी उत्तम संपर्क ठेवून पक्ष बळकटीसाठी कार्य केल्याने त्यांना  आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळाली आहे.

 

Web Title: Distribution of funds to 38,710 thousand farmers before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.