लाभार्थ्यांना गीर गार्इंचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:16 PM2018-07-15T23:16:00+5:302018-07-15T23:16:18+5:30

विख्यात योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात वरोरा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बाबा रामदेव महाराजांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना गीर गार्इंचे वाटप केले होते. यापैकी तीन उर्वरित लाभार्थ्यांना शनिवारी गीर गार्इंचे वाटप करण्यात आले.

Distribution of Geir Gear to beneficiaries | लाभार्थ्यांना गीर गार्इंचे वितरण

लाभार्थ्यांना गीर गार्इंचे वितरण

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती : शेतकऱ्यांनी शेतीपुरक जोडधंदा करावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: विख्यात योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनात फेब्रुवारी महिन्यात वरोरा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळावा व प्रदर्शनीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बाबा रामदेव महाराजांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना गीर गार्इंचे वाटप केले होते. यापैकी तीन उर्वरित लाभार्थ्यांना शनिवारी गीर गार्इंचे वाटप करण्यात आले.
राजुरा तालुक्यातील बाबापूर येथील सुरज पारखी हा शेतात फवारणी करताना मृत्युमुखी पडला होता. त्याच्या कुटुंबीयांना ना. अहीर यांनी व्यक्तीश: उपस्थित राहून गीर गाय मृताचे वडील गोविंदा पारखी यांच्या स्वाधीन केली.
याप्रसंगी राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, जि.प. सभापती गोदावरी केंद्रे, जिल्हा सचिव अरूण मस्की, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्री राजु घरोटे, भाजपा कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, पं.स. सदस्या सुनंदा डोंगे, नगरसेवक राधेश्याम अडाणीया, नगरसेविका प्रिती रेकलवार, सुरेश केंद्रे, मधुकर नरड, भाऊराव चंदनखेडे, वाघुजी गेडाम, महादेव तपासे, बाबापूरचे उपसरपंच शत्रुघ्न पेटकर, दिलीप वांढरे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, सतिश दांडगे, किशोर बावने, सचिन डोहे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पारखी कुटुंबीयांनी या गार्इंचे योग्य संगोपन करून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या अर्थार्जनात भर घालावी. दुग्धोत्पादन हे ग्रामीण कुटुंबीयांचा मुळ व्यवसाय असल्याने या व्यवसायाला जोडधंदा म्हणून स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. शेती व्यवसायावर निर्भर राहून प्रगती शक्य नसल्याने शेतीपुरक व्यवसाय गरजेचे असल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.
पोंभुर्णा तालुक्यातील चेकखापरी येथील जीवनकला साईनाथ सोयाम या निराधार महिलेस पोंभूर्णा भाजप तालुका अध्यक्ष गजानन गोरंटीवार, जि.प. सदस्य राहुल संतोषवार, न.प. उपाध्यक्ष रजिया कुरैशी, पं.स. सदस्य गंगाधर मडावी यांच्या उपस्थितीत गीर गायीचे वाटप करण्यात आले. तसेच चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा या गावातील शहीद नंदकुमार आत्राम यांच्या कुटुंबीयाससुध्दा गीर गाय देण्यात आली. या गायीचा स्वीकार स्व. नंदकुमार यांचे वडील देवाजी आत्राम यांनी केला. यावेळी पं.स.चे माजी सदस्य दयानंद बंकुवाले व बोर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Distribution of Geir Gear to beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.