गरजू रिक्षाचालकांना धान्य किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:07+5:302021-05-25T04:32:07+5:30
भद्रावती : ‘एक हात मदतीचा’ सदराखाली कोविड-१९चा प्रादुर्भाव व मागील एक महिन्यापासूनची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता, वरोरा व भद्रावती ...
भद्रावती : ‘एक हात मदतीचा’ सदराखाली कोविड-१९चा प्रादुर्भाव व मागील एक महिन्यापासूनची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता, वरोरा व भद्रावती शहरातील गरजू रिक्षाचालकांना भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार यांच्यातर्फे धान्याच्या किटचे वाटप करुन सहकार्य करण्यात आले.
भद्रावती येथे यशवंतराव शिंदे महाविद्यालय व वरोरा येथे हनुमान मंदिर परिसर, द्वारकानगरी येथे सोमवारी सकाळी या धान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे, शिंदे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. विवेक शिंदे, वरोराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, दत्ता बोरेकर, जयंत टेमुर्डे, बाळू भोयर, पवन महाडिक, सुरज निब्रड, सतीश गिरसावळे, शुभम निखाडे, हर्षल शिंदे, डॉ. जयंत वानखेडे, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. राजेंद्र साबळे, तेजस कुंभारे, बाळा उपलंचीवार, भूमेश वालदे, भद्रावती रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष कल्याण मंडल, उपाध्यक्ष विनोद कुमरे, सचिव कैलास साखरकर, कोषाध्यक्ष दिनेश बदखल, वरोरा रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष अरविंद तिखट, उपाध्यक्ष प्रमोद धोपटे, कोषाध्यक्ष बाबा खंडाळकर, आदी उपस्थित होते.