शालेय विद्यार्थ्यांना धान्य किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:34+5:302021-06-05T04:21:34+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगावतर्फे गुरुवारी ...
सावरगाव : नागभीड तालुक्यातील कोजबी (चक) येथील सरस्वती विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगावतर्फे गुरुवारी धान्य किटचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर बेरोजगारी व उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. समाजऋण व विद्यार्थीऋण समोर ठेवून वर्ग ५ ते ९ च्या एकूण १०३ विद्यार्थ्यांना जवळपास ५० हजार रुपये किमतीचे तांदूळ, आटा, साखर, तेल व मास्कचे वाटप संस्थेतर्फे करण्यात आले. यापूर्वीही कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागपूरस्थित अनेक गरजूंना जनकल्याण संस्थेतर्फे धान्य किटचे वाटप करण्यात आले होते. हे विशेष. धान्य किटच्या वितरणप्रसंगी संस्था सचिव मनीषा बारापात्रे, अध्यक्ष विजय बारापात्रे, सदस्य डाॅ. सुधाकर नवलाखे, रमेश मस्के, संकेत व उत्कर्ष बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे, सहायक शिक्षक चंद्रशेखर गायकवाड, मधुसूदन नागपूरे,घृष्णेश्वर बोरकर, लिपिक धनराज आत्राम, हरिहर मस्के, परिचर अशोक मेश्राम, गणेश मेश्राम, प्रदीप गोपाले उपस्थित होते.