सलून, वाजंत्री व्यावसायिकांना किराणा किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:04+5:302021-05-30T04:23:04+5:30

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सेवा उपक्रम शंकरपूर येथे वाटप शंकरपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ...

Distribution of grocery kits to saloon and instrument professionals | सलून, वाजंत्री व्यावसायिकांना किराणा किटचे वाटप

सलून, वाजंत्री व्यावसायिकांना किराणा किटचे वाटप

Next

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सेवा उपक्रम

शंकरपूर येथे वाटप

शंकरपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बंटी भांगडिया यांच्या माध्यमातून शंकरपूर येथे अनिल शेंडे यांच्या निवासस्थानी सलून व बँड वाजंत्री व्यवसाय करणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भाजप जिल्हा सचिव राजू पाटील, देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊनमुळे सलून व बँड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची पाळी आली आहे. आर्थिक संकटात मदत करावी, या हेतूने आमदार बंटी भांगडिया यांनी ही मदत पोहोचती केली. यावेळी शंकरपूर जिल्हा परिषद क्षेत्रप्रमुख अविनाश बारोकर, अनिल शेंडे, जगदीश श्रीरामे, कन्नू बघेल, ईश्वर भरडे, आदी उपस्थित होते.

===Photopath===

290521\img-20210529-wa0050.jpg

===Caption===

किराणा किट चे वाटप करताना भाजप पदाधिकारी

Web Title: Distribution of grocery kits to saloon and instrument professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.