आरोग्य केंद्रातर्फे मच्छरदाणीचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:11+5:302021-03-04T04:53:11+5:30
शंकरपूर : ...
शंकरपूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत चार गावांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जंगलालगत असलेल्या गावांना मच्छरदाणीचे वाटप करण्याची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत जंगलालगत असलेल्या इरव्हा, दहेगाव, डोंगरगाव, चकजाटेपर या चार गावांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती रोशन ढोक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आमोद गौरकर, पवन राहुड, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजाता शंभरकर, आरोग्य पर्यवेक्षक हजारे, बालाजी महाले, खोब्रागडे यांच्या हस्ते मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच गावातील लाभार्थी उपस्थित होते.