चंदनखेडा ग्रामपंचायतकडून गावात मच्छरदाणी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:19 AM2021-06-28T04:19:51+5:302021-06-28T04:19:51+5:30
भद्रावती : तालुक्यातील मौजा चंदनखेडा ग्रामपंचायतकडून चंदनखेडा, मक्ता, चरूर (धारपुरे), बोरगाव (धांडे) या गावात मच्छरदाणी वाटप करण्यात आल्या. ...
भद्रावती : तालुक्यातील मौजा चंदनखेडा ग्रामपंचायतकडून चंदनखेडा, मक्ता, चरूर (धारपुरे), बोरगाव (धांडे) या गावात मच्छरदाणी वाटप करण्यात आल्या.
दिवसेंदिवस रोगांचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता चंदनखेडा ग्रामपंचायतकडून नवीन नवीन उपक्रम राबविले जात आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मच्छरांचे प्रमाण वाढत असून, या दिवसामध्ये मलेरियासारखे रोगांचे प्रमाण वाढत असते. याचीच दखल घेत चंदनखेडा ग्रामपंचायतकडून १४व्या वित्त आयोग निधीतून गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या खातेदाराच्या प्रत्येक घरी जाऊन मच्छरदाणी वाटप करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच नयन बाबाराव जांभुळे, उपसरपंच भारती शरद उरकांडे, ग्रामपंचायत सदस्य निकेश भागवत, बंडू निखाते, नानाजी बगडे, मुक्ता सोनूले, प्रतिभा दोहतरे, रंजना हनवते, श्वेता भोयर,सविता गायकवाड, आशा नंनावरे उपस्थित होते.
===Photopath===
270621\img-20210626-wa0003.jpg
===Caption===
मच्छरदाणी वाटप करताना.