विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:22+5:302021-05-28T04:21:22+5:30

सिंदेवाही : बहुजन परिवार तालुका सिंदेवाहीच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑनलाइन तालुकास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परीक्षा, डाॅ. ...

Distribution of prizes to the winners of various competitions | विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

googlenewsNext

सिंदेवाही : बहुजन परिवार तालुका सिंदेवाहीच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित ऑनलाइन तालुकास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परीक्षा, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजूषा व बुद्ध-भीम गीतगायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

य़ाप्रसंगी लोनवाहीच्या ग्राम विकास अधिकारी नीलिमा बनसोड, बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे सचिन शेंडे, बामसेफचे प्रा. भारत मेश्राम, वनाधिकारी दुर्गेकर, बहुजन समाज पार्टीचे नंदू खोब्रागडे, मुख्याध्यापक जयंत लेंजे व प्रा. राजू खोब्रागडे यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. य़ात तालुकास्तरीय बुद्ध-भीम गीतगायन स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे जिल्हा परिषद शाळा उमरवाहीची कल्याणी सदानंद बोरकर, प्राची दीपक मोटघरे व सर्वोदय ज्युनिअर काॅलेज सिंदेवाहीची सरोज संतोष लोखंडे यांना रोख पुरस्कार, प्रशस्तीपत्र व ट्राॅफीचे अतिथींच्या हस्ते वितरण करण्यात आले, तर तालुकास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परीक्षेत ज्ञानेश ज्युनिअर काॅलेज नवरगावची कांचन ठिकरे, सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीची केजुषा लोखंडे व कल्पतरू स्कूल सिंदेवाहीचा श्रेयस विष्णू घुबे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रथम सर्वोदय ज्युनिअर काॅलेज सिंदेवाहीचा सौरव राजू खोब्रागडे, द्वितीय सिंदेवाहीची समता भारत मेश्राम व तृतीय कल्पतरू स्कूल सिंदेवाहीचा शील धर्मेंद्र वैद्य यांना अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.

Web Title: Distribution of prizes to the winners of various competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.