शालेय विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:19 AM2021-06-20T04:19:53+5:302021-06-20T04:19:53+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. संसर्गाच्या या महामारीत विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. संसर्गाच्या या महामारीत विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने तसेच विद्यार्थीऋण समोर ठेवून वर्ग ५ ते १० वीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ११०० मिली सॅनिटायझर व मास्कचे वाटप जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेतर्फे करण्यात आले. या वाटपाप्रसंगी संस्थेचे सचिव मनिषा बारापात्रे, अध्यक्ष विजय बारापात्रे, सदस्य डाॅ. सुधाकर नवलाखे, रमेश मस्के, पंखुरी ठाकूर, रिया यादव, मुख्याध्यापक दीपक बोकडे, सहायक शिक्षक सुरेश बोरकर, चंद्रशेखर गायकवाड, मधुसूदन नागपूरे, घृष्णेश्वर बोरकर, विलास तोडासे, लिपीक धनराज आत्राम, हरिहर मस्के, परिचर अशोक मेश्राम, गणेश मेश्राम, प्रदीप गोपाले उपस्थित होते.