२,८९८ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करणार
By Admin | Published: June 26, 2017 12:43 AM2017-06-26T00:43:58+5:302017-06-26T00:43:58+5:30
यावर्षीही श्रीगुरूजी फाऊंडेशनच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
श्रीगुरूजी फ ाऊंडेशनचा उपक्रम : ३५ जिल्हा परिषद शाळांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
आयुध निर्माणी (भद्रावती) : यावर्षीही श्रीगुरूजी फाऊंडेशनच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम २७ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवसापासून सुरू होत आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेच्या ३५ शाळांची निवड करण्यात आली असून या उपक्रमाचा लाभ दोन्ही तालुक्यातील २ हजार ८९८ विद्यार्थ्यांना होणार आहे.
श्रीगुरूजी फ ाऊंडेशन ही एक सामाजिक नोंदणीकृत संस्था असून वेगवेगळे समाजपयोगी सामाजिक उपक्रम राबवित असते. ही संस्था प्रामुख्याने गरीब शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांकरिता कार्य करते. उपक्रमामध्ये शालेय साहित्य वितरण, संस्थेद्वारा संचालित जनजागृती किर्तन, प्रवचनकार सत्संग मंडळाद्वारे किर्तन, प्रवचन, रामदेगी पदयात्रा, ग्रंथदिंडी असे कार्यक्रम घेण्यात येतात. मागील पाच वर्षांपासून रूग्णवाहिकेद्वारे अविरत रूग्णसेवा करीत आहे. सोबतच संस्थेकडे शीतशवपेटीची सुविधा उपलब्ध आहे.
श्रीगुरूजी फाऊंडेशनच्या वतीने सलग नऊ वर्षांपासून शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम अविरत सुरू आहे. एका शाळेपासून संस्थेने सुरूवात केली. यावर्षी भद्रावती व वरोरा तालुक्यातील ३५ जिल्हा परिषद प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळांमधील २ हजार ८९८ विद्यार्थ्यांना वर्गनिहाय विषयानुसार लागणारे नोटबुक, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, पेन आदी शालेयोपयोगी शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वितेकरिता अध्यक्ष प्रशांत कारेकर, सचिव संजय तोगट्टीवार, राजेश्वर भलमे, पंकज कातोरे, संस्थेचे सर्व सदस्य तसेच भद्रावती प.स.सदस्य, अधिकारी वर्ग, कर्मचारी, जि.प. शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्ग प्रयत्न करीत आहे. सहकार्यदाते आर्थिक तसेच शैक्षणिक साहित्य देवून सहकार्य करीत आहेत.
निवडलेल्या शाळा व विद्यार्थी
शाळेच्या पहिलया दिवसागणीक भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळा गवराळा येथील २१०, विंजासन येथील १६३, शिवाजी नगर येथील ९५, सुरक्षा नगर येथील ४३, कन्या शळा गांधी चौक येथील ४८, नग परिषद जवळील मुलांची शळा येथील ३३, नेताजी नगर येथील ७७, घुटकाळा येथील १७२, चिचोर्डी येथील १३७, गौतम नगर येथील ३२, किल्ला वार्ड येथील ८७, सुमठाणा येथील १२२ विद्यार्थी तसेच भद्रावती ग्रामीणमधून खापरी येथील १४, केसुर्ली येथील १५, चालबर्डी येथील १२१, गुंजाळा येथील १२, कोची येथील २३, चिरादेवी येथील ६३, वारंगाव येथील ११, तेलवासा येथील १३, ढोरवासा येथील ६३, पिप्री येथील १०४, मुरसा येथील १२३, घोनाड येथील ६२, देऊरवाडा येथील ७८, कुनाडा येथील ५१, माजरी हिंदी शाळा येथील १९२ विद्यार्थ्यांना तसेच वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील ४०, रामपूर येथील १३, राळेगांव मोठा शेगांव येथील ३९, टेंमुर्डा येथील ६८, माढळी येथील २११, सोईट येथील ४९, खांबाडा येथील १७३ विद्यार्थी असे भद्रावती व वरोरा तालुक्यातील ३५ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात येणार आहे.