घुग्घुसमध्ये ५७१ रुग्णांना चष्मे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:37+5:302021-09-22T04:30:37+5:30
घुग्घुस : आमदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने सप्ताह सेवा व ...
घुग्घुस : आमदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहराच्या वतीने सप्ताह सेवा व
समर्पण सप्ताहांतर्गत जनसेवेच्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभ हस्ते येथील प्रयास सभागृहात झाले.
१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा सप्ताह सेवा व म्हणून जनसेवेच्या विविध कार्यक्रमांनी येथे साजरा होत आहे. सप्ताहाची सुरुवात ५७१ रुग्णांना चष्मे वाटप करून करण्यात आली. आयोजित सप्ताहात २७१ ज्येष्ठ नागरिकांना काठीचे वाटप, ७१ लाभार्थ्यांना नवीन राशन कार्डचे वितरण, तसेच १७१ मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया, तर जनधन योजनेच्या ७१ लाभार्थ्यांना पासबुक खात्याचे वितरण, यासोबतच शहरातील ७१ फेरीवाल्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप, ७१ गरजू नागरिकांना ब्लॅन्केटचे वाटप, ७१ गोरगरिबांना अन्नधान्य किट, शहरातील ७१ कोरोना योद्ध्यांचा सत्कार व सन्मान, ७१ बचत गटांसाठी कर्ज मेळावा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सेवा व समर्पण सप्ताहात करण्यात येणार आहे.