शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात ८९.३८ टक्के
By admin | Published: February 4, 2017 12:33 AM2017-02-04T00:33:31+5:302017-02-04T00:33:31+5:30
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज शुक्रवारी जिल्ह्यातील २७ केंद्रावर अतिशय शांततेत निवडणूक पार पडली.
चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज शुक्रवारी जिल्ह्यातील २७ केंद्रावर अतिशय शांततेत निवडणूक पार पडली. मतदारांचा चांगला प्रतिसाद या निवडणुकीस लाभल्याने जिल्ह्यात ८९.३८ टक्के मतदान झाले.
सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात २७ केंद्र ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच मतदारांनी केंद्राकडे धाव घेतल्याने अगदी सुरुवातीपासून मतदानाची टक्केवारी चांगली राहिली.
जिल्ह्यातील मतदान केंद्र व त्या केंद्रावर झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे. माढेळी केंद्रावर ७९. १७ टक्के मतदान झाले. वरोरा केंद्र ८९.६० , शेगाव बुज १००, चिमूर ८९.१३, शंकरपूर ८९.६३, नागभीड ९४.५१, ब्रह्मपुरी ९०.३४, गांगलवाडी ९६.८८, तळोधी ९३.१२, नवरगाव ९४.९६, चंदनखेडा ८५, भद्रावती ८९, सिंदेवाही ९५.९२, पाथरी या मतदान केंद्रावर ८८.४६ टक्के मतदान झाले.
सावली या मतदार केंद्रावर ८९.३६, मूल ९२.३, पोंभूर्णा ९१.८०, चंद्रपूर शहर (एक) ८४.४०, चंद्रपूर शहर (दोन) ८६.८, चंद्रपूर ग्रामीण केंद्रावर ८५.५८, बल्लारपूर ८७.३६, राजुरा ९२.६६, कोठारी ९५, गोंडपिंपरी ९१.३८, कोरपना ९५.२९, गडचांदूर ९०.९१ टक्के तर जिवती या केंद्रावर ८८.८२ टक्के मतदार झाले. मतदानाची जिल्ह्याची एकूण टक्केवारी ८९.३८ टक्के असल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)