पालक सचिवांच्या तासिकेने जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 05:00 AM2022-07-08T05:00:00+5:302022-07-08T05:00:21+5:30
ज्यांची ड्यूटी पूर नियंत्रण कक्षात लावली. ते खरेच तेथे उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट द्यावी. गैरहजर आढळल्यास कारवाई करावी. या कालावधीत कोणालाही दीर्घ रजा देऊ नये. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा औषधसाठा ठेवून कोविड लसीकरणाकडेही लक्ष द्यावे, अशाही सूचना पालक सचिवांनी केेल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातून सहा-सात नद्यांना पूर येतो. गोसेखुर्द व संजय गांधी सरोवरातून पाणी सोडल्यास नदीकाठच्या गावांना फटका बसतो. त्यामुळे संभाव्य पूर परिस्थितीत सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा आणि पूर नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावा, अशा सूचना अपर मुख्य सचिव (सहकार व पणन) तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी गुरूवारी आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम उपस्थित होते.
पालक सचिव अनुप कुमार म्हणाले, ज्यांची ड्यूटी पूर नियंत्रण कक्षात लावली. ते खरेच तेथे उपस्थित राहतात की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट द्यावी. गैरहजर आढळल्यास कारवाई करावी. या कालावधीत कोणालाही दीर्घ रजा देऊ नये. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा औषधसाठा ठेवून कोविड लसीकरणाकडेही लक्ष द्यावे, अशाही सूचना पालक सचिवांनी केेल्या.
बैठकीचे सादरीकरण जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, महावितरणच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
बँकांवर कारवाई करा
खरीप कर्ज वाटपा त राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी फारच निराशाजनक आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र कर्ज वाटपात चांगले काम केले. पीक कर्जवाटपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बँकर्सचा नियमित आढावा घ्यावा. ज्या बँका चांगले काम करणार नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना पालकसचिवांनी दिल्या