जिल्हा प्रशासनाचा अंबुजाला अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:07 PM2018-11-28T22:07:21+5:302018-11-28T22:07:37+5:30

अंबुजा सिमेंट कंपनी तसेच पकडीगुड्डम धरण प्रकल्पग्रस्त व अंबुजामध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी ५ वाजेपासून अचानक अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेट समोर ठिय्या मांडला होता. या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने अंबुजा कंपनीला सात दिवसांचा अल्टीमेटम देऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.

District Administration's Ambuja Ultimatum | जिल्हा प्रशासनाचा अंबुजाला अल्टिमेटम

जिल्हा प्रशासनाचा अंबुजाला अल्टिमेटम

Next
ठळक मुद्देसात दिवसांची मुदत : अन्यथा जमीन परत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अंबुजा सिमेंट कंपनी तसेच पकडीगुड्डम धरण प्रकल्पग्रस्त व अंबुजामध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी ५ वाजेपासून अचानक अंबुजा सिमेंट कंपनीच्या गेट समोर ठिय्या मांडला होता. या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने अंबुजा कंपनीला सात दिवसांचा अल्टीमेटम देऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत.
या दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी गेट बंद करून अंबुजा कंपनीतून बाहेर जाणारे सिमेंटचे ट्रक व रेल्वे रॅक रोखली. आंदोलनकर्त्यांनी भूमिकेवर ठाम राहून बुधवारीही दिवसभर ठिय्या मांडला. शेवटी सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान आंदोलनस्थळी कोरपनाचे तहसीलदार गाडे यांनी भेट दिली. गाडे यांनी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) कल्पना निळ यांनी सिमेंट कंपनी व्यवस्थापनाला लिहिलेल्या पत्राची प्रत दिली. यामध्ये अंबुजा सिमेंट कंपनीने तात्काळ सात दिवसांच्या आत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावे. अन्यथा कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. भूसंपादनाचा करार रद्द करण्याची शिफारस केली जाईल, असे नमूद आहे.

Web Title: District Administration's Ambuja Ultimatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.