जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:04 PM2018-01-03T23:04:31+5:302018-01-03T23:04:47+5:30

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोयीचे व्हावे, म्हणून प्रशासनाने बाबा आमटे अभ्यासिका सुरू केली.

District collector beaten | जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Next
ठळक मुद्देशुल्क कमी करण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोयीचे व्हावे, म्हणून प्रशासनाने बाबा आमटे अभ्यासिका सुरू केली. आजघडीला दोनशे ते अडीचशे विद्यार्थी प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्या अभ्यासीकेत अभ्यास करीत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासाने अभ्यासीकेत येणाऱ्यांडून ५५५ रुपये मासिक भाडे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून शुल्क कमी करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आजचे युग स्पर्धेचे युग आहे. त्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातून प्रशासकीय सेवेत जाणाºयांची संख्या कमी आहे. त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यामार्फत सिव्हिल लाइन परिसरात अत्याधुनिक सोेईसुविधायुक्त स्व.बाबा आमटे अभ्यासिका तयार केली. मात्र प्रशासनाने अभ्यासिकेचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. संस्थेमार्फत ही अभ्यासिका चालविली जाणार आहे. त्यामुळे संस्थेने विद्यार्थ्यांवर महिन्याकाठी ५५५ रुपये शुल्क घेण्याचे ठरविले आहे. गावखेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना एवढे शुल्क देणे शक्य नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून शुल्क घेवू नये, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू ठेवावी. रविवार वगळता दुसरा-चौथा शनिवारीही अभ्यासिका सुरू ठेवावी अशी मागणी निवेदनातून केली.

Web Title: District collector beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.