जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला गोसेखुर्द प्रकल्पाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 10:08 PM2019-04-26T22:08:32+5:302019-04-26T22:09:48+5:30
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या.
विदर्भातील महत्त्वाचा सिंचन प्रकल्प असलेल्या गोसीखुर्दचे जाळे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यातसुद्धा पसरलेले आहे. या प्रकल्पाच्या कालव्याकरिता जमीन भूसंपादित करणे सुरूच असून भूसंपादन कायद्यानुसार आजपर्यंत हाताळण्यात येणाऱ्या प्रकरणावर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित उपविभागीय अधिकाºयांना सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली. सोबतच जिल्ह्यातील घोडाझरी प्रकल्प आणि असोलामेंढा प्रकल्पात समाविष्ट असलेल्या कालव्यासंदर्भात आढावा घेण्यात आला.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, उपजिल्हा अधिकारी (भूसंपादन) घनश्याम भुगावकर, चिमूरचे उपविभागीय अधिकारी बी.आर. बेहेरे, कार्यकारी अभियंता एम. जी. नाईक, कार्यकारी अभियंता आर. जी. शर्मा, कार्यकारी अभियंता आर. जी. बघमार, आर. आर. सोनोने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.