जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले गाढव वाचविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:16 AM2019-05-19T00:16:23+5:302019-05-19T00:16:51+5:30
राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला. हा आदेश जिल्ह्यात धडकल्याने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला गाढवांची माहिती संकलित करावी लागणार आहे.
गाढव हा प्राणी कष्टाळू म्हणून जगभरात ओळखल्या जातो. मात्र या प्राण्याला मानवाकडून सम्मान दिला जात नाही. प्राणी जगतामध्ये याच प्राण्याच्या वाट्याला सर्वात मोठी उपेक्षा आली. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार राज्यात २९ हजार १३२ गाढव आहेत. हा प्राणी पाळीव असला तरी त्याच्याकडून कामे करून मोकाट सोडल्या जाते. प्रामुख्याने भटक्या जमातींमध्ये हा प्राणी पाळल्या जातो. कष्टाची करण्यास हा प्राणी थकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या प्राण्यांच्या संवर्धनासाठी कागदोपत्री योजना आहेत. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नाही, असा भटक्या जमाती संघटनांचा आरोप आहे.
गाढव या प्राण्याबाबत देशभरातील स्थिती जाणून घेण्यासाठी १० सप्टेंबर २०१७ ला दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाढवांची संख्या कमी होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारला यासंदर्भात दिली. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी.डी. फरकाडे यांनी कार्यवाही सुरू केली. यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना मागील आठवड्यात आदेश दिला. जिल्ह्यामध्ये गाढवांची संख्या किती याची माहिती सादर करण्याचे कळविण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभाग ही माहिती गोळा करण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यामुळे जिल्ह्यात गाढवांची संख्या किती हे जाहीर होणार आहे.
गाढव उपयुक्त प्राणी
गाढवांचे अवयव आणि रक्ताचा वापर पशु खाद्यामध्ये केला जातो. शिवाय विविध आजारांवरील उपचाराकरिता गाढवांच्या रक्ताचा वापर होतो. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये गाढवांच्या कत्तली होतात. हा प्राणी पाळीव असून मानवाला संरक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांनी दिली.