जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:58+5:302021-06-04T04:21:58+5:30

आढावा बैठकीप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच अन्य अधिकारी. चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा जिल्हाधिकारी अजय ...

District Collector reviewed the deepening and beautification of Ramala Lake | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा आढावा

Next

आढावा बैठकीप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच अन्य अधिकारी.

चंद्रपूर : शहरातील रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त जांभुळे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, ईको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, स्टेशन मास्टर मूर्ती आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, नागरी वस्तीचे सांडपाणी तलावात येणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी. तलावात येणारा मच्छिनाल्याचा प्रवाह वळता करावा. तसेच मच्छिनाला जेथे तलावास येऊन मिळतो, तेथे वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट बसविणे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये खोलीकरण करणे शक्य नसल्यामुळे या कालावधीत निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश आदी कामे निकाली काढा. जेणेकरून पावसाळा संपल्यानंतर त्वरित खोलीकरणाच्या कामाला लगेच सुरुवात करता येईल. याशिवाय तलावाच्या पश्चिम दिशेला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, गणेश व दूर्गामूर्ती विसर्जन कायमचे बंद करून त्याची व्यवस्था इरई नदीपात्रालगत करणे आदी सूचना त्यांनी केल्या.

बैठकीला वेस्टर्न कोल्ड फिल्ड, वन विभाग, पाटबंधारे, भूमी-अभिलेख व रोजगार हमी योजनेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: District Collector reviewed the deepening and beautification of Ramala Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.