रिपाइंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:41 PM2018-05-04T23:41:41+5:302018-05-04T23:41:41+5:30

रिपाइंचे (आ)े राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनात पक्षाचा विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा ठराव नुकताच घेण्यात आला.

The district collector stops in front of the office | रिपाइंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

रिपाइंचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांची पूर्तता करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रिपाइंचे (आ)े राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनात पक्षाचा विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्याचा ठराव नुकताच घेण्यात आला. त्या ठरावानुसार चंद्रपूर शहर तथा जिल्हा रिपाइं (आ) च्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
भिमा कोरेगाव प्रकरणी षडयंत्र रचनाऱ्या आरोपींना अटक करावी, एकबोटे प्रमाणे संभाजी भिडेला अटक करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल करू नये, दलिताविरुद्ध कलम ३९५ नुसार दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणे बंद कराव, पदोन्नतीमध्ये अनुसुचित जाती, जमातीला आरक्षण देण्यासाठी लवकर कायदा करावा, अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काऱ्यांना पकडून कडक शासन करावे, बलात्कार व अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनेला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षा समिती नेमण्यात यावी, तसेच सुरक्षा समितीमध्ये राजकीय व्यक्तींना वगळून सामाजिक कार्यकर्त्यांची नेमणूक करावी, चंद्रपूर शहर तथा जिल्हा संपूर्ण देशातच अतिउष्ण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता सुरुवातीचे १०० युनिटवर शुल्क आकारणी बंद करुन १०१ युनिटनंतर सवलतीच्या दरात रक्कम आकारण्यात यावी, प्रदूषण पसरविणाऱ्या कारखाण्यास ताळे ठोकण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी सदर आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विदर्भ प्रदेश महासचिव अशोक घोेटेकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजू जंगम, सिद्धार्थ पथाडे, बाळू कृणाल आमटे, संदीप जंगम, संजय तिवारी, अ‍ॅड. शैलेंद्र देशकर, कविता निखारे उपस्थित होते.

Web Title: The district collector stops in front of the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.