जिल्ह्यात सुमारे दोन लाख लस साठवणुकीची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:00 AM2020-12-17T05:00:00+5:302020-12-17T05:00:33+5:30

कोरोना संसर्गात सर्वप्रथम आरोग्यसेवा मजबुत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नरत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, टेक्नीशियन, आरोग्यसेवेतील वाहनचालक, अंगणवाडी सेविका, खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे.  याशिवाय ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्याने ही लस देण्यासाठी प्रशासनाने तसा डेटा तयार केला आहे. लस उपलब्ध होण्याची आता प्रतीक्षा आहे.

The district has a storage capacity of about two lakh vaccines | जिल्ह्यात सुमारे दोन लाख लस साठवणुकीची क्षमता

जिल्ह्यात सुमारे दोन लाख लस साठवणुकीची क्षमता

Next
ठळक मुद्देलसीकरणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी : कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

  रवी जवळे
    लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनावरील लस जानेवारी महिन्यात येणार असल्याच्या अंदाज आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. लस आलीच तर ती सर्वप्रथम आरोग्यसेवेतील १५ हजार ७०० लोकांना दिली जाणार आहे. ही लस साठवणूक करण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. जवळपास दोन लाख लस सुखरूप ठेवता येणार आहे. याची क्षमता १० हजार लिटर आहे.
कोरोना संसर्गात सर्वप्रथम आरोग्यसेवा मजबुत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नरत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका, टेक्नीशियन, आरोग्यसेवेतील वाहनचालक, अंगणवाडी सेविका, खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांना सर्वप्रथम लस दिली जाणार आहे. 
याशिवाय ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्याने ही लस देण्यासाठी प्रशासनाने तसा डेटा तयार केला आहे. लस उपलब्ध होण्याची आता प्रतीक्षा आहे.

शितगृहाची व्यवस्था
कोविड-१९ या विषाणूवरील लस ० ते ८ डिग्री सेल्सीयस तापमानातच ठेवावी लागते. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे रेफ्रीजरेटर आरोग्य विभागाने खरेदी केले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मनपा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शितगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 

लस ठेवण्याचे जिल्ह्यात ७८ ठिकाण
कोरोनावरील लस जिल्ह्यात उपलब्ध झालीच तर ती ठेवण्यासाठी जिल्ह्यात ७८ शितगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. यातील सात गृहे मनपा हद्दीत असतील. १३ उपजिल्हा रुग्णलयाच्या ठिकाणीदेखील लस ठेवता येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातही ही लस ठेवण्यासाठी शितगृहे सज्ज केली आहेत. 

वाहतुकीसाठी ७२ गाड्या
आरोग्य विभागाकडे एक वॅक्सीन वाहन आहे. या वाहनाने नागपूरवरून लस जिल्ह्यात आणल्या जाणार आहे. त्यानंतर १३ उपजिल्हा रुग्णालय व ५८ पीएचसीच्या रुग्णवाहिकांनी ही लस ठिकठिकाणी पाठविली जाणार आहे.

कोरोना विषाणूवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. तयारी अंतिम टप्यात आहे.   दोन लाख लस साठवणुकीची क्षमता आपल्याकडे असणार आहे. जिल्ह्यातील ५८ प्राथमिक आरोग्य केंद्रातही ही लस साठवणूक करून ठेवता येईल, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. 
- डॉ. राजकुमार गहलोत,
जिल्हा आरोग्य अधिकारी, 
चंद्रपूर.

Web Title: The district has a storage capacity of about two lakh vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.