जिल्हा चूल आणि धूरमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:20 PM2019-07-01T22:20:28+5:302019-07-01T22:20:42+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
गॅस वितरण तसेच सोलर कुंपण, गमबूट व टॉर्च वितरणाचा कार्यक्रम विचोडा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शंभर टक्के गॅस कनेक्शन प्रकल्प गतीने सुरू असून त्याअंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक घराला चूलमुक्त, धूरमुक्त करण्यासाठी, लाकूडतोडी पासून जिल्ह्यातील वनसंपत्तीला वाचवण्यासाठी तसेच त्यादरम्यान होणाऱ्या मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टिकोनातून गॅस वितरण सुरू आहे.
चंद्रपूर तालुक्यातील विचोडा, छोटा नागपूर, पडोली, अंभोरा, ताडाळी, चारगाव व मोरवा या गावांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत समाविष्ट करून घेण्यात आले. या योजनेअंतर्गत गावात विविध सुविधा निर्माण करण्यात येत असून या सात गावातील लाभार्थ्यांना गॅस, सोलर कुंपण, गमबूट व टॉर्च इत्यादी साहित्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विचोडा येथे वितरण करण्यात आले. यामध्ये २३१ लाभार्थ्यांना एलपीजी गॅस कनेक्शन, ४८१ लाभार्थ्यांना सोलर कुंपण, प्रत्येकी २०० लाभार्थ्यांना गमबूट व टॉर्चचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून गावांतील महिला धुरापासून सुरक्षित झालेल्या असून गमबूट तसेच टॉर्च वाटप करून शेतकऱ्यांनाही स्वत:चे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करता येणार आहे.
सोलर कुंपणामुळे शेतीचे नुसकान करणाºया वन्यप्राण्यांना आळा घालता येणार आहे. ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी शक्तीने काम करत असून दिलेला शब्द पूर्ण करण्याचा हट्ट कायम ठेवलेला आहे. वाघ व वन्यप्राणी गावातील शेतीचे खूप नुकसान करतात, अशी माहिती मिळताच सहाही गावे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेत जाणीवपूर्वक समाविष्ट करून घेतली. त्यामुळे या गावांना याचा फायदा होणार आहे.
दारूबंदीबद्दल बोलताना त्यांनी सामाजिक सुरक्षिततेकरिता दारूबंदीचे फायदे उपस्थितांना सांगितले. तसेच दारूबंदी ही सामाजिक परिवर्तनासाठी राबवलेली चळवळ असून दारूबंदी जिल्ह्याचे स्वप्न फक्त माझेच नाही, ही तर इथल्या प्रत्येक नागरिकांचे आहे. त्यासाठी गावकºयांनी पुढाकार घेऊन दारूबंदी यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा आदर्श घेऊन चळवळ स्वरूपात राबवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेती विकासासाठी १०० तरुणांची फौज निर्माण करण्यात येत असून त्यांच्या माध्यमातून शेतकºयांना सुदृढ करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
अधिकाºयांवर होणार कारवाई
मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर आणि घरची मुलं कामासाठी गावाबाहेर गेल्यानंतर घरातील ज्येष्ठ मंडळी एकाकी पडतात. त्यांच्याही मदतीसाठी सरकार योजना आखत आहे. सोबतच वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मिळणारी नुकसान भरपाई पंधरा दिवसात मिळेल, असा शासन निर्णय सरकार लवकरच पारित करेल. जे अधिकारी पंधरा दिवसात शेतकºयाला नुकसान भरपाई प्रदान करणार नाही, अशा अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सार्वजनिक स्वयंपाकासाठी 10 हजार रुपये किमतीचे भांडे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका?्यांना दिल्या.अर्थसंकल्पाबाबत विचार व्यक्त करताना राज्यातील निराधार, विधवा आणि घटस्फोटित महिलांना मिळणारी मदत अत्यल्प असल्यामुळे त्यात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.