रुग्ण नोंदणीमध्ये जिल्हा माघारला

By admin | Published: May 16, 2017 12:30 AM2017-05-16T00:30:58+5:302017-05-16T00:30:58+5:30

राज्य शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानात पथदर्शी प्रकल्प राबविण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

District repatriation in sick registration | रुग्ण नोंदणीमध्ये जिल्हा माघारला

रुग्ण नोंदणीमध्ये जिल्हा माघारला

Next

१२ हजार रुग्णांचीच नोंद : पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानात पथदर्शी प्रकल्प राबविण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात १ लाख रुग्णांची नोंदणी अपेक्षित असताना १५ मे रोजीपर्यंत जिल्हाभरात ११ हजार ९३१ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. या अभियानात इतर पाच जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूर जिल्हा माघारला आहे. नोंदणीची मुदत २७ मे रोजीपर्यंत देण्यात आली आहे.
गरीब, गरजू रुग्णांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा विद्यमान शासकीय योजनांमधून विनामूल्य उपलब्ध करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्यक्ष स्वस्थ महाराष्ट्र अभियान १ मे रोजी सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अभियानाचे उद्घाटन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानात १ ते २७ मे रोजीपर्यंत संबंधित रुग्णांच्या आजाराचे निदान होण्यासाठी रुग्णांची नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले. हा पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यातील चंद्रपूर, सांगली, अकोला, पालघर, बीड आणि नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली. या सहा जिल्ह्यांमध्ये १ मे रोजीपासून रुग्ण नोंदणी सुरू झाली आहे.
५ मेपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ७६० रुग्णांची नोंदणी करण्यात आली होती. तर १० मे रोजीपर्यंत ६ हजार रुग्णांची नोंदणी झाली होती. तोपर्यंत चंद्रपूर जिल्हा नोंदणीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. १५ मे रोजीपर्यंत ११ हजार ९३१ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु रुग्ण नोंदणीमध्ये जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यावेळी महिल्या क्रमांकावर बीड आणि दुसऱ्यावर सांगली जिल्हा होता. आता मात्र, चंद्रपूरपेक्षा अकोला जिल्ह्याने अधिक रुग्ण नोंदणी करून तिसरा क्रमांक गाठला आहे. चंद्रपूर चौथ्या क्रमांकावर आला आहे. बीड जिल्ह्यात ३५ हजार रुग्ण नोंदणी झाली आहे. त्यानंतर सांगली १८ जार ९९४, अकोला १५ हजार २१८, चंद्रपूर ११ हजार ९३१, नाशिक ९ हजार ३२३ आणि पालघर १ हजार ५८१ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.

रुग्णांना मोफत उपचार
या अभियानात नोंदणी करणाऱ्या रुग्णांना पोटाचे विकार, श्वसनाचे विकार, हृदयरोग, अस्थिरो, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्र विकार, स्त्रीरोग, बालरोग, गं्रथींचे विकार, मनोविकार, कर्करोग, कान-नाक-घसा विकार, दंतरोग, जनरल मेडिसीन, प्लास्टिक सर्जरी, जनरल सर्जरी, लठ्ठपणा आदी विविध आजारांची पूूर्वतपासणी करण्यात येणार आहे. त्यात निदान झाल्यावर रुग्णांना विनामूल्य सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याकरिता आधी रुग्ण नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

नोंदणी अभियानाला मुदतवाढीची गरज
या अभियानात २७ मे रोजीपर्यंत रुग्ण नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. १ लाख रुग्णांची नोंदणी अपेक्षित आहे. आता उर्वरित केवळ १२ दिवसांमध्ये ८८ हजार रुग्णांची नोंदणी होणे शक्य नाही. ही योजना जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी रुग्णांची नोंदणी मोठ्या संख्येने होणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणामुळे सर्व प्रकारच्या आजारांनी ग्रासलेला आहे. सर्व प्रकारच्या आजारांचे रुग्ण पूर्वतपासणीमध्ये सापडू शकतात. त्याकरिता मुदतवाढ आवश्यक आहे.

या अभियानात अपेक्षेपेक्षा कमी रुग्ण नोंदणी दिसत असली तरी आपल्या जिल्ह्याचे काम फार वाईट नाही. आणखीही काम करण्याची संधी आहे. अभियानाच्या प्रचार-प्रसाराचे काम शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडे २६ लाख रुपयांचा निधी मागितला आहे.
-डॉ. पी. एम. मुरंबीकर,
सदस्य सचिव, जिल्हा समिती.

Web Title: District repatriation in sick registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.