दोन रस्त्यांना जिल्हा मार्गाचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:17 PM2018-08-13T23:17:55+5:302018-08-13T23:18:13+5:30
तालुक्यातील ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोलारी रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रादेशिक) मुख्य अभियंत्यानी हे रस्ते दर्जोन्नत करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान शासनाकडून निधी मिळणार असल्याने परिसराच्या विकासाला गती येईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.
ब्रह्मपुरी : तालुक्यातील ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोलारी रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (प्रादेशिक) मुख्य अभियंत्यानी हे रस्ते दर्जोन्नत करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान शासनाकडून निधी मिळणार असल्याने परिसराच्या विकासाला गती येईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.
ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी आणि तोरगाव ते कोल्हारी या रस्त्यावरील वैनगंगा नदीवर मोठ्या उंचीचा पुल व बंधाºयाचे बांधकाम करून भंडारा जिल्ह्यातील इटाण गावाला जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे दळणवळणाची व्याप्ती वाढणार असून जिल्हा मार्गाला जोडण्यात येणार आहे. कालेता ते नान्होरी या रस्त्यासाठी प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली. २०१९ - २० ला हे काम सुरू होणार आहे. रस्ते विकास योजना -२००१ मधील जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या लांबीत २० किमी वाढ होणार आहेत. तसेच इतर जिल्हा मार्गाच्या जिल्हा लांबीचाही विस्तार होणार असल्याने या मार्गाचा दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव प्रादेशिक मुख्य अभियंत्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला होता.
सोमवारी या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली त्यामुळे ब्रह्मपुरी, काहाली, कालेता, नान्होरी, तोरगाव, देउळगाव, बेलगाव, कोलारी या मार्गावरून दळणवळणाला गती येणार आहे.