मुद्रा योजनेत जिल्हा आदर्श व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:07 PM2018-10-07T22:07:27+5:302018-10-07T22:08:07+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेतून जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळताना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठताना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने समाजाच्या आर्थिक व औद्योगिक जाणीवांचे भान ठेवले पाहिजे.

District should be ideal in the currency scheme | मुद्रा योजनेत जिल्हा आदर्श व्हावा

मुद्रा योजनेत जिल्हा आदर्श व्हावा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्ह्यातील दहा हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेतून जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळताना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठताना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने समाजाच्या आर्थिक व औद्योगिक जाणीवांचे भान ठेवले पाहिजे. चंद्रपूर जिल्हा या योजनेत आदर्श जिल्हा म्हणून पुढे आणताना या वर्षामध्ये किमान दहा हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
स्थानिक नियोजन भवनात आयोजित मुद्रा बँक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुद्रा बँक योजना राबविताना बँकांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. यासाठी परिसरातील लोकप्रतिनिधींनीदेखील यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. खानापूर्ती करण्यासाठी ही योजना नसून यातून खरोखर उद्योजक उभे झाले पाहिजे. गुजरातमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे ज्यांना उद्योगधंद्याची आवड आहे, त्या सर्वांना यातून संधी दिली गेली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार अनिल सोले, आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील कोणते उद्योग उपयोगी पडू शकतात. त्यासाठी अन्य विभागाची मदत घ्यावी, असे आ. अनिल सोले म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यावा
चंद्रपूर जिल्ह्यातील उपलब्ध असणाऱ्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपापल्या भागातील उद्दिष्ट निश्चित करावे. मुद्रा बँक कर्ज देणारा, त्याची परतफेड करणारा आणि त्यातून उद्योग उभारणारा उमेदवार देण्याचे काम सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येवून केल्यास मुद्रामधील योग्य उमेदवारांना लाभ मिळणे व या योजनेचा योग्य वापर होणे शक्य आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासोबतच या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी सर्व यंत्रणांनी पुढे येण्याबाबतही त्यांनी सांगितले.
२३० कोटींचे कर्ज दिले
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन वर्षात मुद्रा योजनेतून वाटप करण्यात आलेल्या कर्ज पुरवठयाबाबतही माहिती दिली. मुद्रा योजनेतून २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये चंद्रपूर जिल्हयात १७ हजार ५०० खातेदारकांना १६० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर १ एप्रिल २०१८ पासून सप्टेंबर महिना अखरेपर्यंत ७० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी तीन गट तयार करण्यात आले आहे.

Web Title: District should be ideal in the currency scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.