राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जिल्हाभर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:21 AM2021-06-25T04:21:06+5:302021-06-25T04:21:06+5:30
चंद्रपूर : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रांतील व जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे ...
चंद्रपूर : ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रांतील व जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व - ओबीसी सर्व असा एल्गार करीत ओबीसी समाजाने जिल्हाभरातील तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात निदर्शने केली.
चंद्रपूर येथेही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी ओबीसी आरक्षण पूर्ववत करा, ओबीसी जनगणना करा, ओबीसी समाजाच्या समस्या सोडवा अन्यथा सत्ता सोडा, असा इशारा डाॅ. अशोक जीवतोडे यांनी सरकारला दिला.
यावेळी आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, नितीन कुकडे, नंदू नागरकर, संदीप आवारी, राजू कक्कड, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सूर्यकांत खनके, प्रा. अनिल शिंदे, कुणाल चहारे, अजय बलकी, महिला जिल्हाध्यक्ष ज्योत्स्ना राजुरकर, पौर्णिमा मेहरकुरे, प्रा. रविकांत वरारकर, विजय मालेकर, प्रा. रवी जोगी, मंगेश पाचभाई, गणेश आवारी, पारस पिंपळकर, शाम राजूरकर, देवराव दिवसे, भुवन चिने, संदीप पिंपळकर, राजकुमार नागापुरे, नंदकिशोर टोंगे, रंजित पिंपळशेंडे, रवी टोंगे, सुनील मुसळे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, ओबीसी संघटना सहभागी झाल्या होत्या.