कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा युवा क्रीडा महोत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:04+5:302021-03-20T04:26:04+5:30
सास्ती : जिल्ह्यातील कोराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राजुरा तालुक्यातील साखरी येथे दरवर्षी संघर्ष युवा विकास मंडळ, साखरी (वा.) ...
सास्ती : जिल्ह्यातील कोराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राजुरा तालुक्यातील साखरी येथे दरवर्षी संघर्ष युवा विकास मंडळ, साखरी (वा.) च्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा जिल्हा युवा क्रीडा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.
राजुरा तालुक्यातील साखरी येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून साखरीसारख्या लहानशा गावात ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींना एक हक्काची जागा उपलब्ध करून देऊन जिल्हा युवा क्रीडा महोत्सवाचे आयोजन करीत आहे. यावर्षीचा जिल्हा युवा क्रीडा महोत्सव १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगीच मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळून क्रीडा महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी वेकोलीच्या पोवनी उपक्षेत्राचे प्रबंधक जे. एकंबरम, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, संघर्ष युवा विकास मंडळाचे अध्यक्ष राजू घरोटे, माजी उपसरपंच अमोल घटे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गिलोरकर, मंडळाचे सचिव ॲड. प्रशांत घरोटे, शेखर कावळे, सुदर्शन बोबडे, प्रमोद निवलकर, सचिन गोरे, अमित निमकरसह सर्व सदस्य उपस्थित होते.
बॉक्स
खेळाडूंच्या आनंदावर विरजण
दरवर्षी या जिल्हा क्रीडा महोत्सवात जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातून स्पर्धक सहभागी होत होते. परंतु महोत्सव रद्द झाल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. दरवर्षीच्या त्यांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करीत पुढील वर्षीच्या आयोजनाकरिता सहकार्याची अपेक्षा संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.