जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७३.७५ टक्केवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 05:00 AM2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:27+5:30
नवीन बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील २९, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील १७, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील १६, नागभीड तालुक्यातील २४, वरोरा तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील ११, राजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील तीन असे एकूण १२६ बाधित पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना काळात मागील काही दिवसात जिल्ह्यात दिलासादायक गोष्टी घडत आहेत. आधी बाधितांची संख्या कमी झाली. मृत्यूची संख्याही कमी झाली. आता कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७३.७५ टक्क्यावर पोहचला आहे.
जिल्ह्यात शनिवारी १२६ नवीन बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता ११ हजार ८९० वर पोहोचली आहे. आतापर्यंत आठ हजार ७६९ कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या दोन हजार ९४० आहे.
नवीन बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील २९, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील १७, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील १६, नागभीड तालुक्यातील २४, वरोरा तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील ११, राजुरा तालुक्यातील सहा तर गडचिरोली येथील तीन असे एकूण १२६ बाधित पुढे आले आहे.
चंद्रपूर शहरातील व परिसरातील एकोरी वार्ड, नगीनाबाग, जुनोना चौक शांतीनगर, बाबुपेठ, रामनगर, आरवट, श्रीराम नगर, जगन्नाथ बाबा नगर, जटपुरा वार्ड, महाकाली वार्ड, पठाणपुरा वार्ड, पंचशील चौक परिसर, अंचलेश्वर वॉर्ड भागातून बाधित पुढे आले आहे.
याशिवाय बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्ड, बामणी, गणपती वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील माला कॉलनी परिसर, जवाहर नगर भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील शेबंळ, आनंदवन, चिनोरा परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर, चिखलगाव, खेड, बालाजी लेआउट परिसर, अजुर्नी मोरगाव, चौगान, देलनवाडी, कुरझा, शांतीनगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी कॉलनी परिसर, चिचोर्डी, श्रीराम नगर, सूर्य मंदिर वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, पळसगाव, देवाडा, लोनवाही, मुरमाडी परिसरातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील तळोधी, चिखलगाव, जीवनापूर, गिरगाव,कोजबी, वाढोणा, प्रियदर्शनी चौक परिसर, महात्मा फुले चौक, डोंगरगाव, वढोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील राजोली परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव भागातून बाधित पुढे आले आहे.
एका बाधिताचा मृत्यू
शनिवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, भिवापूर वार्ड बाबुपेठ, चंद्रपूर येथील ७५ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ७ ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १८१ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी जिल्ह्यातील १७२ रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित मृत्यू चंद्रपुरात झाले असले तरी ते इतर जिल्ह्यातील आहेत.