राजगृहावरील हल्ल्याचा जिल्हाभर निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:00:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर मुंबई येथील निवासस्थान व ग्रंथालय असलेले ...

Districtwide protest against the attack on the palace | राजगृहावरील हल्ल्याचा जिल्हाभर निषेध

राजगृहावरील हल्ल्याचा जिल्हाभर निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : माथेफिरूंना अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर मुंबई येथील निवासस्थान व ग्रंथालय असलेले ऐतिहासिक राजगृह प्रेरणास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी देश-विदेशातील लाखो नागरिकांना समतेचा संदेश देणाºया राजगृहावरील हल्ला करणाऱ्यांचा आंबेडकरी संघटनांनी बुधवारी तीव्र शब्दात निषेध केला. राज्य सरकारने अशा माथेफिरूंचा शोध घेवून कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. दादरी मुंबई येथील राजगृहाची मंगळवारी अज्ञात माथेफिरूंनी तोडफोड करून नुकसान केले.
ही घटना देशातील लाखो शोषितांच्या अस्मितेची विटंबना करणारी आहे. सरकारने आरोपींचा शोध घेवून कठोर कारवाई करण्याची मागणी संविधान संवर्धन समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. निवेदन देताना खुशाल तेलंग, हिराचंद्र बोरकुटे, किशोर पोतनवार, अ‍ॅड. सत्यविजय उराडे, अंकूश वाघमारे, बंडू नगराळे, प्रा. कोमल खोब्रागडे, तथागत पेटकर, अ‍ॅड. कपिल भगत, सुरेश नारनवरे, अजय गणवीर, सिद्धार्थ वाघमारे, फिरोजखान पठाण, अजिज शेख, मोहन रायपुरे, अ‍ॅड. लोहकरे, विद्याधर लाडे आदी उपस्थित होते.

खासदारांनी केला निषेध
खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध करून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

Web Title: Districtwide protest against the attack on the palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.