शिवाजीकालीन पद्धतीने माता तुळजाभवानीची घटस्थापना
By admin | Published: October 2, 2016 12:49 AM2016-10-02T00:49:02+5:302016-10-02T00:49:02+5:30
रय्यतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजानी तुळजापूर येथे माता तुळजाभवानीची स्थापना केली होती.
चंद्रपूर : रय्यतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजानी तुळजापूर येथे माता तुळजाभवानीची स्थापना केली होती. त्यामुळे राजे शिवाजी महाराजांना धैर्य मिळत असे. त्याच परंपरतेला घेऊन राज्यात नवरात्रीच्या निमित्याने नव दिवस हिंदू समाजात फार महत्त्व असून मोठ्या उत्साहात साजरे केल्या जातात.
बाबुपेठ येथील पॅरामाउंट कॉन्व्हेंट येथील मंदिरात शिवाजीकालीन पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात, भगव फेटे, नववारी वेशभूषा परिधान करून पॅरामाउंटच्या विद्यार्थीनीनसह संस्थाध्यक्ष पांडूरंग आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात माता तुळजाभवानी मातेची घटस्थापना करण्यात आली.
नवदिवस चालणाऱ्या उत्सवात पॅरामाउंट कॉन्व्हेंटने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यात रांगोळी स्पर्धा, भजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सुपर मॅम स्पर्धा, फन अॅन्ड फ्रुड, दांडिया, गितागायन स्पर्धा, असे विविध कार्यक्रमाच्या तालमीत माता तुळजाभवानीची आराधना करण्यात येणार असून ९ आॅक्टोबर रोजी घट विसर्जित करण्यात येत आहे.यासाठी पॅरामाउंट कॉन्व्हेंटचे संस्थापक पी.एस. आंबटकर, प्रिती आंबटकर, प्रांजली रघाताटे, प्रतिमा ठाकूर, नंदा ठाकूर, संगीता कोटकर, रुपाली आंबटकर, निशा, निशांत, ऋतुजा, मंदा, तेजस्विनी,पपीया, उज्ज्वला तथा सर्व कर्मचारीवृंद सहकार्य करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)