बल्लारपूर शहराची प्रभाग पुनर्रचना

By admin | Published: July 9, 2016 01:15 AM2016-07-09T01:15:36+5:302016-07-09T01:15:36+5:30

बल्लारपूर शहरातील ३२ वॉर्डांची १६ प्रभागात विभागणी करण्यात आली असून ही विभागणी सन २०११ च्या लोकसंख्येनुसार झालेली आहे.

Division of the city of Ballarpur replica | बल्लारपूर शहराची प्रभाग पुनर्रचना

बल्लारपूर शहराची प्रभाग पुनर्रचना

Next

३२ वॉर्ड १६ प्रभाग : कुणाला सोयीचे तर कुणाला गैरसोयीचे, काहींना पेच
ंबल्लारपूर : बल्लारपूर शहरातील ३२ वॉर्डांची १६ प्रभागात विभागणी करण्यात आली असून ही विभागणी सन २०११ च्या लोकसंख्येनुसार झालेली आहे. यापूर्वी या शहरात एकूण ८ प्रभाग होते आणि एका प्रभागात साधारणत: चार वॉर्डाचा समावेश होता आणि एका प्रभागात नगरसेवक संख्या चार अशी होती.
आता मात्र प्रभागांची संख्या दुप्पट झाली आहे व या नवीन प्रभाग रचनेत एका प्रभागात कुठे दोन-तीन, तर कुठे चार वॉर्ड आले आहेत. एका वॉर्डाचे दोन तुकडे करून त्यातील एक तुकडा एका प्रभागात तर दुसरा लगतच्या प्रभागात टाकण्यात आलेला आहे. यामुळे, आपण नेमके कोणत्या प्रभागातून लढावे आणि कोणता प्रभाग सोयीचा पडणार, याच्या शोधात इच्छूक उमेदवार लागले आहेत. या प्रभाग पुनर्रचनेने बऱ्याच जणांपुढे पेच निर्माण केला आहे. नवीन प्रभाग रचना काहींना सोयीची तर काहींना गैरसोयीची असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या शहराचे भौगोलिक दृष्ट्या वस्ती विभाग आणि डेपो व टेकडी विभाग असे मुख्य दोन (रेल्वे लाईन अलिकडील व पलिकडील भाग) भाग आहेत. मागील प्रभाग रचनेत डेपो कडील साईबाबा वॉर्ड आणि रेल्वे लाईन अलिकडील डॉ. आंबेडकर वॉर्ड हे दोन भिन्न भिन्न अंतर असलेले वॉर्ड मिळून प्रभाग बनविला होता.
या दोन्ही वॉर्डातील लोकांना तसेच निवडणुकीत उतरणाऱ्यांना ही प्रभाग रचना गैरसोयीची होती. त्यात बदल होईल, असे वाटत होते. परंतु, नवीन प्रभाग रचनेत आकार कमी न होता, त्यात वाढच झालेली आहे. याबाबत नाराजी आढळून येत आहे. प्रभागाची रचना कशीही असली तरी इच्छुकांना मैदानात उतरायचेच आहे, यात वाद नाही. इच्छूक उमेदवार वार्डरचनेनंतर निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
बल्लारपूर शहराचे नवीन प्रभाग, त्यात येणारे वॉर्ड आणि त्या वॉर्डातील राखीव जागा पुढीलप्रमाणे आहेत. कंसात राखीव प्रवर्गाचा उल्लेख- प्रभाग १- शांतीनगर- शांतीनगर, पं. दिनदयाल वॉर्ड, गोकुलनगर (अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव, ब- सर्वसाधारण), प्रभाग २- राजेंद्र प्रसाद वार्ड, कन्नमवार वार्ड (अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला), प्रभाग ३- कन्नमवार वार्ड, विवेकानंद वार्ड, विद्यानगर, दादाभाई नौरोजी वार्ड (अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण), प्रभाग ४ - शिवनगर, विवेकानंद वॉर्ड, फुलसिंग नाईक वॉर्ड (अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण), प्रभाग ५- गोकुळनगर, शिवनगर, गुरुनानक वार्ड, थापर वार्ड (अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्व साधारण), प्रभाग ६- महाराणा प्रताप वार्ड, विद्यानगर, दादाभाई नौरोजी वार्ड (अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब- सर्वसाधारण), प्रभाग ७- डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, मौलाना आजाद, विद्यानगर, महाराणा प्रताप व रवींद्र नगर (अ- अनुसूचित जाती महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग), प्रभाग ८ - रवींद्र नगर, संतोषी माता वार्ड (अ- अनुसूचित जाती महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग), प्रभाग ९- बालाजी वार्ड, दादाभाई नौरोजी, डॉ. जाकीर हुसैन वार्ड (अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला), प्रभाग १० - बुद्धनगर, बालाजी वॉर्ड, रेल्वे वार्ड, लक्ष्मीनगर (अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला), प्रभाग ११- रेल्वे वार्ड, साईबाबा वार्ड, बुद्धनगर, गौरक्षण वार्ड (अ- अनुसूचित जमाती महिला, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग), प्रभाग १२- गोरक्षण वार्ड, शिवाजी वार्ड, साईबाबा वार्ड (अ- अनुसूचित जमाती, ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), प्रभाग १३- म. गांधी वार्ड, श्रीराम वार्ड, राणी लक्ष्मी वार्ड, डॉ. आंबेडकर वार्ड (अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण), प्रभाग १४- किल्ला वार्ड, थापर वार्ड, महात्मा गांधी वार्ड (अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला), प्रभाग १५- श्रीराम वार्ड, सुभाष वार्ड, लो. टिळक वार्ड, शहिद भगत सिंह वार्ड (अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्व साधारण), प्रभाग १६- सरदार पटेल वार्ड आणि लोकमान्य टिळक वार्ड (अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला) याप्रमाणे सर्व वार्डांचे आरक्षण काढण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Division of the city of Ballarpur replica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.