विभागीय कृषी सहसंचालकांनी केली पीक पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:17+5:302021-06-26T04:20:17+5:30

वरोरा : तालुक्यातील शेगाव बु. मंडळामध्ये नागपूर विभागीय कृषी सह संचालक रवींद्र भोसले यांनी खरीप हंगामातील विविध पिकाची पीक ...

Divisional Agriculture Joint Director conducted crop inspection | विभागीय कृषी सहसंचालकांनी केली पीक पाहणी

विभागीय कृषी सहसंचालकांनी केली पीक पाहणी

Next

वरोरा : तालुक्यातील शेगाव बु. मंडळामध्ये नागपूर विभागीय कृषी सह संचालक रवींद्र भोसले यांनी खरीप हंगामातील विविध पिकाची पीक पेरणी व पीक परिस्थितीची पाहणी करून कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोयाबीन पीक पेरणीमध्ये बीबीएफचा वापर, पट्टा पद्धत व टोकन पद्धतीने लागवड तसेच रुंद सरी वरंभा पद्धतीने कापूस व तूर पिकांची लागवड या बाबीचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या.

वरोरा तालुक्यातील त्यांच्या दौऱ्यात मौजा-राळेगाव येथील शेतकरी धनराज गोविंदा हनवते यांनी ३० एकर क्षेत्रावर रुंद सरी वरंबावर ओळ पद्धतीने सोयाबीनची लागवड केली. या पिकाचीही भोसले यांनी पाहणी केली व संबंधित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. मौजा- भेंडाळा येथील शेतकरी पुरुषोत्तम श्रीहरी रोडे यांनी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्रात स्वतःच्या कल्पकतेतून बदल घडवून विकसित केलेल्या बीबीएफ यंत्राची पाहणी भोसले व उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. जाधव यांनी केली व उपयुक्त सूचना दिल्या.

यावेळी शेगाव बु. चे मंडळ कृषी अधिकारी विजय काळे व कृषी सेवक मत्ते व पवन मडावी यांनी केले.

===Photopath===

250621\img-20210619-wa0115.jpg

===Caption===

image

Web Title: Divisional Agriculture Joint Director conducted crop inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.