दिव्यांग बालकलाकाराने गीतातून दिला जगण्याचा मंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:16 PM2017-09-25T23:16:26+5:302017-09-25T23:16:45+5:30
आज पैसा कमविण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे आपण खरं सुख विसरत आहो. जी गोष्ट आपल्याकडे नाही, त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपली उणीव शोधा व पुढे चला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनखेडा : आज पैसा कमविण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे आपण खरं सुख विसरत आहो. जी गोष्ट आपल्याकडे नाही, त्यासाठी रडत बसण्यापेक्षा आपली उणीव शोधा व पुढे चला. यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निच्छित केले पाहिजे. व त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. बालकांनी टीव्ही मोबाईलवर प्रेम करण्यापेक्षा अभ्यासावर प्रेम करा, मर्दानी खेळ खेळा, अपयशाला घाबरून जावू नका. मनाचं बुध्दीचं अपंगत्व आलं तर ते आत्महत्या करतात. हे विचार येवू नये यासाठी धोर महात्वाचे चरित्र वाचा. ते आचरणात आणा, दु:खी निराश होण्यापेक्षा अनंदात जीवन जगा, असे कळकळीचे आवाहन दिव्यांग बालकलाकार चेतन उचितकर यांनी पारोधी येथील कार्यक्रमात केले.
मुळ पारोधी येथील रहिवासी असलेले दादाजी झाडे परीवार चंद्रपूर येथे स्थायी असले तरी दरवर्षी श्री संत आडकिने महाराज पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्याच निमित्ताने वाशीम जिल्ह्यातील केकत उमरा या गावखेड्यातील उद्योन्मुख दिव्यांग बालकलाकार चेतन उचितकर यांचा प्रेरणादायी संगीतमय असा अनोखा चेतन सेवांकुर आर्केष्टा आयोजित करण्यात आला.
यात विविध धार्मिक, प्रबोधन गितासोबतच दिव्यांग बाल कलाकार चेतनने विद्यार्थी आत्महत्या, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती इ. ज्वलंत सामाजिक विषयावर आपल्या व्याख्यानातुन प्रबोधन करीत जगण्याची नवी प्रेरणा दिली. तसेच विविध विषयावर त्यांनी गीतातून प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.