दिव्यांग कल्याणाचा निधी अर्खचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:33 AM2018-03-17T01:33:22+5:302018-03-17T01:33:22+5:30
चंद्रपूर शहर महानगरपालिकांमध्ये दिव्यांगासाठी असलेला राखीव निधी अजूनही अर्खचित आहे. त्यामुळे राखीव निधी खर्च करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीतर्फे महापौर अंजली घोटेकर यांना देण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकांमध्ये दिव्यांगासाठी असलेला राखीव निधी अजूनही अर्खचित आहे. त्यामुळे राखीव निधी खर्च करण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलन समितीतर्फे महापौर अंजली घोटेकर यांना देण्यात आले. तसेच निधी खर्च न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला.
मागील अर्थ संकल्पात अपंग (दिव्यांग) व्यक्तीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नियमानुसार बजेटमध्ये तीन टक्के निधी दिव्यांग व्यक्तीसाठी राखून ठेवणे आवश्यक असताना २०१२ पासून चंद्रपूर शहर महानगरपालिकाने (दिव्यांगच्या कल्याणासाठी आवश्यक निधीच तरतूद केलेली नव्हती. प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी २०१७-१८ च्या अर्थ संकल्पीय आमसभेत ही बाब लावून धरली होती. दरम्यान महानगरातील दिव्यांगच्या कल्याणासाठी एक कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला. सदर निधी खर्च करण्यासाठी एका समितीची स्थापना करणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने तो निधी अर्खचित आहे. त्यामुळे सदर निधी खर्च करण्यासाठी समिती नेमावी, दिव्यांगांची नोंदणी करावी, व शासनाच्या आदेशामध्ये नमूद निर्देशानुसार निधी खर्च करावा, या मागणीचे निवेदन प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाझारे व नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात महापौरांना देण्यात आले. या शिष्टमंडळात आलीया खान, सोनी आईटलावार, अश्विनी सहारे, मुन्ना खोब्रागडे, सतीश मुल्लेवार, पंकज मिश्रा, वैभव अलोने, अप्रिल चौधरी, उत्तम साव, भारत दुर्गे, ठेंगडे, इमदाद उल्ला शेख, सतीश खोब्रागडे आदी उपस्थित होते.