दीया मिर्झाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:46 PM2018-02-22T23:46:09+5:302018-02-22T23:48:24+5:30
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल, असा संदेश दिला.
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या सदस्यांसह एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्या विदर्भात आल्या होत्या. यावेळी त्यांनी डब्ल्यूटीआयद्वारे नागझिरा, नवेगाव, ताडोबा कारिडोरच्या गावांमध्ये तयार करण्यात येत असलेल्या उन्नत चुलींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. स्वत: त्या चुलीवर पोळ्या सुद्धा शेकल्या. त्यांनी स्वत: बालपणात पारंपारीक चुलींमुळे होण्याऱ्या धुरामुळे महिला व बालकांना त्रास होताना पाहिले. यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागल्याचे सांगितले. ज्या महिला काही कारणास्त गॅस किंवा इतर साधनांचा उपयोग करीत नाही, त्यांच्यासाठी डब्ल्यूटीआयच्या उन्नत चुलींचे प्रयत्न वरदान असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अतिथींनी ग्राम गराडा व रामपुरी येथील महिलांनी तयार केलेल्या चुलीवर मातीच्या ताव्यावर बनविलेल्या पोळ्यांचा आस्वाद घेतला.
या वेळी पेंच टायगर रिझर्वचे निदेशक रविकिरण गोवेकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव प्रवीण परदेशी, एशियाचे निदेशक बिट्टू सहगल, वन्यजीवप्रेमी अनिलकुमार उपस्थित होते.
जंगलांचे संरक्षण व महिलांचे आरोग्य
या वेळी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे निदेशक एरिक सोलहेइम यांनी भारतात महिला उपयोगात आणत असलेल्या पारंपरीक चुली व उन्नत चुलींची कार्यपद्धती समजून घेतली. उन्नत चुलींमुळे महिलांच्या आरोग्याचे संरक्षण होत असून लाकडांच्या कमी वापरामुळे जंगलांचे संरक्षणही होत असल्याचे सांगितले.
तसेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतीय निदेशक अतुल भगई यांनी, देशात दरवर्षी जवळपास २.५ लाख महिलांना चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे आजारी होतात. त्यामुळे भारतीय महिलांनी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत अधिक कुशल व पर्यावरणास अनुकूल तंत्राचा वापर करून महिलांचे आरोग्य व पर्यावरण संरक्षणात योगदान द्यावे, अशी पंतप्रधानाची इच्छा आहे. अशात डब्ल्यूटीआयच्या वतीने उन्नत चुलींचा कार्यक्रम अधिक उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.