शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:28 AM2018-08-21T00:28:34+5:302018-08-21T00:29:49+5:30
जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
मागील आठवडाभर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन ही दोन पिके चार दिवसांपासून पाण्याखाली आहेत. राजुरा, बल्लारपूर व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका अधिक असल्याचे जाणवते. राजुरा, बल्लारपूर कोरपना, गोंडपिंपरी, जिवती तालुक्यात वैनगंगा वर्धा नदीचा फटका बसलेला आहे. कापूस, सोयाबीन व धान पिकाचेदेखील यामध्ये नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकºयांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे सर्व पात्र शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई तातडीने देणे गरजेचे आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ८ हजार १५३ हेक्टरमध्ये कापूस, १ हजार ३३२ हेक्टरमध्ये सोयाबीन व ८३० हेक्टरमध्ये धानाचे असे ८ हजार ८९८ हेक्टरमध्ये पुराचे पाणी शिरले. परिणामी २ हजार १७६ हेक्टरमध्ये पाणी थांबल्याने पिके धोक्यात आली आहेत.
जिल्हा यंत्रणेने सोमवारपासून पंचनामे सुरू करावेत. अतिवृष्टीमुळे वर्धा व पैनगंगा नदीला पूर आला आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाली आहेत. जनजीवन सामान्य स्थितीवर येईल, यासाठीही प्रशासनाने कार्य करावे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले आहेत.