प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:19 AM2017-11-25T00:19:34+5:302017-11-25T00:20:17+5:30
शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी वेकोलिला दिल्या़ मात्र वेकोलिने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेतले नाही.
आॅनलाईन लोकमत
गोवरी : शेतकऱ्यांनी स्वत:च्या जमिनी वेकोलिला दिल्या़ मात्र वेकोलिने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नोकरीत सामावून घेतले नाही. पोवनी २ व ३ या कोळसा खाणींचे भूमिपूजन एकाच वेळी केले. परंतु पोवनी ३ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिने नोकरीत घेतले नाही. हा अन्याय असून स्वत:च्या जमिनी देऊनही नोकरी व योग्य मोबदला मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागत असेल तर हे सरकार गरिबांच्या कामाचे नाही़ हा अन्याय तातडीने बंद करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी केली़ पोवनी फाट्यावर शुक्रवारी रास्ता रोखो आंदोलनाप्रसंगी आयोजित सभेत केला़
यावेळी अॅड़ चटप पुढे म्हणाले, की सरकार शेतकºयांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेताना दिसत नाही. शेतकºयांना केवळ अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. शेतमालाला तोकडा दर असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतमालाना उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा, सर्व शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज संपवून सरसकट कर्जमाफी करावी राजुरा- भोयगाव, नारंडा- पोवनी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. विरुर (गाडेगाव) कोलमाईन्समध्ये राहिलेल्या १७ टक्के शेतकºयांच्या जमिनी वेकोलिने घेऊन शेतकºयांना नोकरीत सामावून घ्यावे. यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने अॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात पोवनी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले़ केला. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी राजुरा- कवठाळा मार्गावरील वाहतूक तीन तास रोखून धरली होती. आंदोलनामुळे वाहतूक प्रभावित झाली़ वेकोलितून कोळसा वाहतूक शेकडो ट्रक दोन्ही बाजूला उभा होत्या़
आंदोलन स्थळी कोणतीही अनुचित घटना घऊ नये म्हणून ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात राजुरा पोलिसाचा ताफा दाखल झाला होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेखर देशमुख आंदोलनस्थळी दाखल झाले होते. मात्र, शेतकºयांनी सरकारविरोधी घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले़
शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर दिवे, शेषराव बोंडे, बाजार समितीचे सभापती हरिदास बोरकुटे, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख बाबा पाटील कावळे, दशरथ बोबडे, मारोतराव लोहे, दत्तुजी ढोके, गणेश काळे, बंडू जुनघरी, सुरज जिवतोडे, प्रमोद लांडे, सचिन निखाडे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले उपस्थित होते.
५० आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका
शेतकरी संघटनेने पोवनी फाट्यावर केलेल्या रास्तारोको आंदोलनात शेतकरी नेते व माजी आमदार अॅड. चटप यांच्यासह जवळपास ५० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली़ ठाण्यात हजर केल्यानंतर े काही वेळेत सुटका केली़