दायित्व समजून पत्रकारिता करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:08 PM2019-01-07T23:08:26+5:302019-01-07T23:08:44+5:30
जगातल्या सर्व देशांमध्ये भारताची लोकशाही हे जागतिक वैभव बनले आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील चारही स्तंभ मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचे दायित्व, जबाबदारी व कर्तव्य समजून पत्रकारांनी पत्रकारिता करावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगातल्या सर्व देशांमध्ये भारताची लोकशाही हे जागतिक वैभव बनले आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील चारही स्तंभ मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्याचे दायित्व, जबाबदारी व कर्तव्य समजून पत्रकारांनी पत्रकारिता करावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
चंद्रपूर येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रेल्वे स्थानकाजवळच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये त्यांनी राज्य शासनाने पत्रकारांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सोबतच राज्य शासन पत्रकारांच्या संदभार्तील कोणतीही अडचण सोडविण्यात तत्पर असून महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबांनादेखील कॅशलेस पद्धतीने आरोग्य सेवा देण्याबाबत विचार करीत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांच्या काही समस्यांबाबत माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठांसोबत चर्चा घडवून आणू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, सत्यनारायण तिवारी, बबन बांगडे, मुरली मनोहर व्यास उपस्थित होते. यावेळी लोकमतचे वार्ताहर फारुख शेख, आशिष गजभिये, चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे, यशवंत दाचेवार, ज्ञानदेव जुनघरे, गोलू बाराहाते, डॉ. आशिष व्यास, बाबा बेग, प्रमोद राऊत यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील वार्ताहरांची व नागरिकांची उपस्थिती होती.