कर्जासाठी अडवणूक करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:50 PM2017-12-16T23:50:54+5:302017-12-16T23:52:15+5:30

जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

Do not bargain for loan | कर्जासाठी अडवणूक करू नका

कर्जासाठी अडवणूक करू नका

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा आढावा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीमध्ये बदल घडून आणण्याकरीता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करता यावा, म्हणून दूधाळू जनावरे देण्याची योजना सरकारने सुरू केली. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घेतलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठक दिले.
बैठकीला महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, अर्चना जिवतोडे, बँकेचे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात जंगल, पाणी, शेती आदी सर्वच बाबी उपलब्धही दुधाचे उत्पादन अल्प आहे. त्याकरीता दुग्ध विकास विभागाने पुढाकार घेऊन नागरिकांना गायी व म्हशी पाळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. उच्च जातीच्या गायी व म्हशी खरेदी करुन देण्यास पुढाकार घ्यावा, अशी सूचना ना. अहीर यावेळी दिली.जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कुकुटपालन व मत्स्य व्यवसाय वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागांने शेतकऱ्यांशी संवाद साधावा. योग्य मार्गदर्शन करून आर्थिक प्रगती साध्य करण्यास मदत करावे, असेही त्यांनी सांगितले. आसोलामेंढा व अमलनाला प्रकल्पातील मत्स्यबीज केंद्र नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावे.
मत्स्यव्यवसाय करणाºयांना मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावे. चंद्रपूर शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पडले आहे. त्यातील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येवून हा प्रकल्प त्वरीत सुरु करावा, अशी सूचना महानगरपालिकेला दिली.
शहरात मलनिस्सारण यंत्रणा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यात येवून नागरिकांना पाणी मिळेल, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी अर्ज केलेत. त्या सर्व अर्जांची योग्य पडताळणी करुन सर्वांना न्याय द्यावा, असेही ना. अहीर या दृष्टीने विचार करण्यात यावा, असेही ना. अहीर यांनी सांगितले. वेंडर अ‍ॅक्ट, झरपट व इरई नदीचे सौंदर्यीकरण, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी राबविलेल्या योजनांची बैठकीत माहिती दिली.

Web Title: Do not bargain for loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.